भरधाव वेगातील कारचा थरार! मद्यधुंद चालकानं महिलांना उडवलं

गुजरातमधील वडोदरा येथे गुरुवारी झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचा(women) मृत्यू झाला आहे. मद्यधुंद अवस्थेतील कारचालकाने भरधाव वेगात स्कूटीला धडक दिल्याने हा अपघात घडला. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, अपघातानंतर संतप्त नागरिकांनी चालकाला कारमधून बाहेर ओढून चांगलाच चोप दिला.

व्हायरल सीसीटीव्ही फुटेजमध्ये सार्वजनिक रस्त्यावर दोन महिला(women) स्कूटीवरून जात असताना अचानक भरधाव वेगाने आलेल्या कारने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत महिला काही फुटांवर फेकल्या गेल्या. अपघातानंतर नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले आणि चालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
या घटनेनंतर बडोदा पोलिसांनी मद्यधुंद चालकाविरोधात गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. मात्र, अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, अनेकांनी या घटनेबाबत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
सोशल मीडियावर नागरिकांनी रस्ते सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करत कठोर कारवाईची मागणी केली आहे. एका युजरने “पण तिथे तर दारूबंदी आहे ना?” असा प्रश्न उपस्थित केला, तर काहींनी “अशा मद्यधुंद चालकांवर कठोर कारवाई झाली पाहिजे” असे म्हटले आहे.
या घटनेनंतर वडोदरा शहरात रस्ते सुरक्षेच्या नियमांविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मद्यधुंद चालकांकडून होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासनाने अधिक कडक उपाययोजना करण्याची गरज आहे.
टीप: अपघाताचा धक्कादायक हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
हेही वाचा :
पण काँग्रेस कुठंय ते शोधलं पाहिजे…; पटोलेंच्या राजकीय ऑफरचा बच्चू कडूंनी घेतला खरपूस समाचार
आयपीएल २०२५ नंतर युजवेंद्र चहल या संघाकडून खेळताना दिसणार, अचानक घेतला मोठा निर्णय
भाजप पदाधिकाऱ्याकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग पिस्तुलाचा धाक दाखवत केला अत्याचार