साउथ अभिनेता नागा चैतन्य याने अभिनेत्री समंथा रुथ प्रभू हिला घटस्फोट दिल्यानंतर अभिनेत्री शोभिता धुलिपाला हिच्यासोबत दुसरं लग्न केलं.(divorce ) सांगायचं झालं तर, नागा चैतन्य आणि समंथा यांच्या घटस्फोटानंतर अनेक चर्चा रंगल्या. कोट्यवधी रुपये खर्च करत नागा आणि समंथा यांनी लग्न केलं. पण दोघांचं लग्न फार काळ टिकलं नाही. अखेर लग्नाच्या 4 वर्षांनंतर नागा आणि समंथा यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.नागा आणि समंथा विभक्त झाल्यानंतर घटस्फोटाची अनेक कारणं समोर आली. त्यांच्या घटस्फोटाचं कारण 200 कोटी रुपयांची भरमसाठ पोटगी असल्याचं म्हटलं जात होतं. परंतु आता सततच्या अफवांना दुजोरा देत, स्टारच्या जवळच्या सूत्रांनी खुलासा केला आहे की समंथा रूथ प्रभूपासून वेगळे होण्यासाठी 200 कोटी रुपयांच्या पोटगीचा दावा पूर्णपणे निराधार होता.
स्वतः नागा चैतन्या याने 200 कोटी रुपयांच्या पोटगीचा दावा फेटाळला आहे. नुकताच झालेल्या एका पॉडकास्टमध्ये नागा चैतन्य म्हणाला, ‘आम्हाला आमच्या स्वतःच्या मार्गावर चालायचं होतं. स्वतःचीच काही कारणं असल्यामुळे आम्ही घटस्फोटाचा निर्णय घेतला. आम्ही एकमेकांचा सन्मान करतो आणि आमच्या – आमच्या रीतेने आयुष्य जगत आहोत…’ असं नागा चैतन्य म्हणाला.
समंथाने देखील घटस्फोटावर मौन सोडलं होतं…
‘कॉफी विथ करण’ मध्ये, समांथा रूथ प्रभूनेही एकदा या विचित्र अफवांबद्दल थेट वक्तव्य केलं होतं. ‘मी पोटगी स्वरुपात 200 कोटी रुपये घेतले आहेत. दररोज सकाळी मी आयकर अधिकाऱ्यांना काहीही नाही.. असं दाखवण्याची वाट पाहयाची. प्रथम त्यांनी पोटगीबद्दल एक कथा रचली. (divorce )नंतर त्यांना लक्षात आले की ती विश्वासार्ह कथा वाटत नाही. मी कोणाकडून देखील एक रुपया घेतलेला नाही… असं समंथा म्हणाली होती.नागा चैतन्य आणि समांथाच्या जवळच्या एका कॉमन फ्रेंडनेही दोघांशी घटस्फोटाबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं. ‘जेव्हा दोन लोक परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतात, विशेषतः इतक्या आदराने, तेव्हा पोटगीची संकल्पना कार्य करत नाही. ते आर्थिक मागण्यांमुळे विभक्त झालेले नाहीत.’
नागा चैतन्य आणि समंथा रुथ प्रभू यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. 2017 मध्ये नागा चैतन्य आणि समंथा यांनी मोठ्या थाटात लग्न केलं. पण दोघांचं लग्न फार काळ टिकलं नाही. अखेर लग्नाच्या 4 वर्षांनंतर दोघांचा घटस्फोट झाला.(divorce )घटस्फोटानंतर नागा चैतन्य याला अनेकदा शोभिता धुलिपाला हिच्यासोबत स्पॉट करण्यात आलं. ज्यामुळे दोघांच्या अफेअरच्या चर्चांनी जोर धरला. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर 2024 मध्ये नागा आणि शोभिता यांनी लग्न केलं. दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले.
हेही वाचा :