प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीला कोरोनाची लागण, इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत दिली माहिती

कोरोना पुन्हा डोकं वर काढतो असं चित्र सध्या समोर आहे. मुंबईमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा शिरकाव झालेला पाहायला मिळत आहे. २ जणांवर कोरोनावरील उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची आज बातमी समोर आली होती. आता या दरम्यानच प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीलाही(actress) कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर आली आहे. ‘बिग बॉस १८’मधील प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शिरोडकर हिला कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त काही तासांपूर्वीच समोर आलं आहे. तिने स्वत: सोशल मीडियावरुन आपल्या चाहत्यांना ही माहिती दिली आहे.

९० च्या दशकात आघाडीवर असलेली आणि नुकतीच बिग बॉस १८ मुळे पुन्हा प्रसिद्धीझोतात आलेल्या अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान झालं आहे. अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत कोरोना झाल्याची माहिती दिली आहे. शेअर केलेल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये शिल्पाने लिहिले की, “हॅलो मित्रांनो! माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. तुम्ही सुरक्षित राहा आणि मास्क लावा…’ असं अभिनेत्रीने आपल्या चाहत्यांना आवाहन केलं आहे. दरम्यान अभिनेत्रीची ही सोशल मीडिया पोस्ट तुफान व्हायरल होत असून चाहत्यांकडून तिच्या तब्येतीची विचारपूस केली जातेय.

शिल्पाची ही पोस्ट पाहिल्यानंतर चाहते आपली लाडकी अभिनेत्री(actress) लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी देवाकडे प्रार्थना करीत आहेत. सर्व परिस्थिती सामान्य आहे, तरीही कोरोना होणं कसे शक्य आहे ? याबद्दलही काहींनी चिंता व्यक्त केली आहे. शिल्पाच्या पोस्टवर चाहत्यांसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनीही तिच्या हेल्थवर कमेंट केली आहे. नम्रता शिरोडकर, चुम दरांग, सोनाक्षी सिन्हा, इंदिरा कृष्णा, रोहित वर्मा सह अनेक सेलिब्रिटींनी अभिनेत्रीला तब्येतीची विचारपूस करत तिला आरामाचा सल्ला दिला आहे.

दरम्यान, सिंगापूरमध्ये दररोज कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढताना दिसत आहेत. सिंगापूरच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी मंगळवारी माहिती दिली की, देशात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. त्यांनी असेही स्पष्ट केले की, सध्या देशात पसरणारा कोरोनाचा व्हेरिएंट मागीलपेक्षा जास्त संसर्गजन्य नाही. आरोग्य मंत्रालय आणि संसर्गजन्य रोग एजन्सी (CDA) ने जारी केलेल्या निवेदनानुसार, २७ एप्रिल ते ३ मे दरम्यान कोविडचे सुमारे १४,२०० नवीन रुग्ण आढळले आहेत. तर गेल्या आठवड्यात ही संख्या ११,१०० च्या आसपास होती.

हेही वाचा :

बंटी पाटील-मुश्रीफ की शिंदे-फडणवीस कोण ठरणार सरस? महाडिकांची चाल अन् गोकुळमध्ये ट्विस्ट

अरेरे! ‘Cannes’च्या रेड कार्पेटवर उर्वशी रौतेला झाली Oops Moment ची शिकार

महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपचा मोठा डाव; ‘तोच’ फॉर्म्युला वापरणार