पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत १ फूट वाढ, राधानगरी, काळम्मावाडी धरणांची पाणीपातळी वाढली; २० मार्ग बंद

गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने काल ता.३० सकाळपासून दमदार हजेरी लावली.(foot) शहरासह जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली. त्यामुळे पंचगंगेच्या पातळीत १४ इंचाने वाढ झाली. तसेच राधानगरी, दूधगंगा, पाटगावसह प्रमुख धरणक्षेत्रातही मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. नद्यांचे पाणी वाढत असल्याने जिल्ह्यातील ३३ बंधारे पाण्याखाली गेले असून २० मार्ग बंद झाले.दरम्यान, शहरातील जुन्या जिल्हा न्यायालयाच्या आवारात मोठे झाड कोसळून चार चारचाकी वाहनांचे नुकसान झाले. या झाडावरील घरट्यातील १८ पक्षी मृत झाले तर १० पक्षांना वाचवून उपचारासाठी पांजरपोळकडे पाठविण्यात आले. हे झाड व वाहने बाजूला करण्यास अग्निशमन दलाला तब्बल चार तास लागले.

पावसाने दिवसभर जोरदार हजेरी लावल्याने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागली. सकाळी पंचगंगेची पाणी पातळी राजाराम बंधारा येथे २८ फूट आठ इंच इतकी होती. ती रात्री वाढून ३० फूट पाच इंचांवर पोहोचली. दिवसभर पाऊस जोरदार पडल्याने शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले. करवीर निवासिनी अंबाबाई दर्शनासह अन्य पर्यटनस्थळांना भेटी द्यायला आलेल्या पर्यटकांची धावपळ झाली. (foot) तसेच शहरातील भाजी मंडई, धान्य बाजार या ठिकाणीही विक्रेते व नागरिकांची गैरसोय झाल्याचे चित्र पहायला मिळाले.

ठिकठिकाणी पाण्याची तळी साचल्याने वाहनधारकांचीही अडचण झाली. तसेच अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.(foot) पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्यासह सात बंधारे, कासारी नदीवरील तीन, भोगावती नदीवरील चार, दूधगंगा नदीवरील दोन, वारणा नदीवरील तीन, हिरण्यकेशी नदीवरील तीन, तुळशी नदीवरील एक, वेदगंगा नदीवरील तीन, सर्फनाला नदीवरील एक, ताम्रपर्णी नदीवरील पाच, चित्री नदीवरील एक बंधारे पाण्याखाली गेले.सुरक्षिततेच्या कारणास्तव या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. तर जिल्ह्यातील एक राज्य मार्ग, चार प्रमुख जिल्हा मार्ग, चार इतर जिल्हा मार्ग, ११ ग्रामीण मार्ग बंद असून या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू आहे. जिल्ह्यातील तीन कच्च्या घरांची पडझड होऊन दोन लाख ८५ हजारांचे नुकसान झाले.

हेही वाचा :