भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार, ‘कॅप्टन कूल’ म्हणून ओळख असलेल्या महेंद्रसिंग धोनीचा(Captain)आज ७ जुलै २०२५ ४४ वा वाढदिवस. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतरही धोनीच्या लोकप्रियतेत किंचितही घट झालेली नाही. उलट त्याची ब्रँड व्हॅल्यू आणि कमाई दरवर्षी वाढतच आहे. क्रिकेटशिवाय तो आता यशस्वी उद्योजक आणि गुंतवणूकदार देखील बनला आहे.२००४ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर धोनीने एकदिवसीय, टी२० आणि कसोटी तिन्ही प्रकारांमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व केलं. २००७ टी-२० विश्वचषक, २०११ वनडे विश्वचषक आणि २०१३ चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारा तो एकमेव कर्णधार आहे. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जला पाच वेळा विजेता बनवणाऱ्या कर्णधाराचं आयुष्य आर्थिकदृष्ट्या देखील जबरदस्त यशस्वी ठरलं आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही धोनी IPLमध्ये सक्रिय असून, २०२५ पर्यंत त्याने आयपीएलमधून तब्बल ₹204.4 कोटींची कमाई केली आहे. त्याची ब्रँड व्हॅल्यू ८०० कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचंही रिपोर्ट्समध्ये नमूद आहे. IPL व्यतिरिक्त तो अनेक नामवंत ब्रँडचा ब्रँड अॅम्बेसेडर असून, त्यातूनही तो मोठी कमाई करतो. धोनीच्या एकूण संपत्तीचा अंदाज ₹१००० कोटींपेक्षा जास्त असल्याचं मानलं जातं. निवृत्तीनंतरही तो जाहिरात, व्यवसाय आणि गुंतवणुकीच्या माध्यमातून करोडोंची उलाढाल करत आहे. (Captain)धोनीचा शांत स्वभाव, खेळातील यश, आणि जबाबदारीची भावना यामुळे त्याच्यावर ब्रँड्सचा विश्वास टिकून आहे.
क्रिकेट व्यतिरिक्त धोनीने फॅशन, क्रीडा, मनोरंजन आणि रिअल इस्टेट क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. (Captain)त्याची कंपनी ‘धोनी एंटरप्रायजेस’ विविध स्टार्टअप्स आणि क्रीडा प्रकल्पांमध्ये सहभागी आहे. ‘रांची रेज’ हा हॉकी संघ, ‘धोनी स्पोर्ट्स’, तसेच त्याचे फिल्म प्रॉडक्शन हाऊसही धोनीच्या आर्थिक यशात मोलाचा वाटा उचलत आहेत.ब्रँड एंडोर्समेंट, व्यवसाय, आणि इतर वैयक्तिक गुंतवणुकीतून धोनीचं वार्षिक उत्पन्न कोट्यवधींमध्ये आहे. अनेक प्रसिद्ध कंपन्यांसोबत तो ब्रँड पार्टनरशिप करत असून, त्याची व्यावसायिक रणनीती सुद्धा त्याच्या मैदानावरच्या नेतृत्वक्षमतेप्रमाणेच अचूक आणि फायदेशीर ठरते आहे.धोनीकडे रांचीतील भव्य फार्महाऊस, मुंबई आणि दुबईतील मालमत्ता, तसेच दुर्मिळ आणि लक्झरी कार्स आणि बाईक्सचा मोठा संग्रह आहे. त्याच्या कलेक्शनमध्ये Rolls Royce, Ferrari, Audi Q7, Hummer H2, Jeep Grand Cherokee, Pontiac Firebird यांसारख्या अनेक लक्झरी ब्रँड्सच्या गाड्या आहेत.
हेही वाचा :