‘हे बेकायदेशीर आहे,’ क्रिकेटच्या मैदानात पहिल्यांदाच असं घडलं; फलंदाजाच्या खिशात चक्क…; VIDEO व्हायरल

क्रिकेटच्या(cricket) मैदानावर खेळताना सोबत कोणत्याही प्रकारचं उपकरण ठेवण्याची परवानगी नसते. जेणेकरुन खेळाडू मैदानाबाहेर असणाऱ्यांशी संपर्क साधू शकत नाही. सोबत डिजिटल डिव्हाईस असल्यास खेळाडू मॅच फिक्सिंगमध्ये सहभागी असण्याची किंवा बेकायदेशीर कृत्य करत असल्याची शक्यता नाकारली जाऊ शकत नाही. इंग्लंडच्या काऊंटी चॅम्पिअनशिप सामन्यात असाच प्रकार घडला आहे. लँकेशायर आणि ग्लॉस्टरशायर यांच्यातील सामन्यादरम्यान हा विचित्र प्रकार घडला.

लँकेशायरचा गोलंदाज टॉम बेली फलंदाजीसाठी आला होता. पण यादरम्यान एका विचित्र गोष्टीमुळे तो चर्चेत आला आहे. दोन धावा काढण्याचा प्रयत्न करत असताना, बेलीचा मोबाईल फोन त्याच्या ट्राउझरच्या खिशातून पडला. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. बेलीने फलंदाजी करताना त्याचा फोन सोबत का घेतला होता? असा प्रश्न यानिमित्ताने विचारला जात आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहिल्यानंतर आश्चर्य व्यक्त करत आहेत.

सामन्याच्या दुसऱ्या दिवशी बेली फलंदाजीसाठी आला होता. लँकेशायरने प्रथम फलंदाजी(cricket) करताना 8 गडी गमावत 401 धावा केल्या. बेली 31 चेंडूत 22 धावा करत नाबाद राहिला.

या घटनेनंतर सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. एका युजरने हे नक्कीच बेकायदेशीर आहे असं म्हटलं आहे. तर एकाने याची परवानगी कशी मिळू शकते? अशी विचारणा केली आहे. यासंदर्भात खेळाडूला फटकारलं पाहिजे असं मत एका युजरने मांडलं आहे. इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू अ‍ॅलेक्स ट्यूडरनेही याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडीओत बेलीला फोन खिशातून खाली पडल्याची काहीच कल्पना नव्हती असं दिसत आहे. ग्लॉस्टरशायरच्या गोलंदाजाच्या हे लक्षात आलं. दरम्यान फोन पुन्हा बेलीकडे देण्यात आला की अम्पायरने तो जप्त केला हे समजू शकलं नाही.

हेही वाचा :

इंडियन आयडल विजेता पवनदीप राजनचा भीषण अपघात

तरुणांना ‘या’ जन्मतारखेच्या मुलींपासून दूर राहणे का आवडते? कारण जाणून शॉक बसेल

विद्येच्या मंदिरात महिला शिक्षिकांचे जोरदार भांडण; VIDEO तुफान व्हायरल