इचलकरंजीत ड्रग्ज रॅकेट उघडकीस; टोळी अटकेत, सूत्रधार पसार

‘मिशन झीरो ड्रग्ज’ मोहिमेंतर्गत गावभाग पोलिस व पोलिस उपअधीक्षक पथकाने शहरातील नशेच्या अड्ड्यांवर रविवारी कारवाई केली(mastermind)आणि प्रतिबंधित मेफफेंटर्मीन सल्फेट या इंजेक्शन विकणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या.त्यांच्याकडून एकूण दोन लाख ३६ हजार ९६४ किमतीचा मुद्देमाल जप्त करत तिघांना अटक केली आहे. मुख्य संशयित संग्राम अशोकराव पाटील वय २९, रा. श्रीपादनगर, सचिन सुनील मांडवकर २५, रा. यशवंत कॉलनी अभिषेक गोविंद भिसे २५ रा. लालनगर, सर्व इचलकरंजी असे त्यांची नावे आहेत. तिघांना न्यायालयाने तीन दिवसांची कोठडी सुनावली आहे. पोलिस उपाधीक्षक समीरसिंह साळवे यांना मिळालेल्या माहिती आधारे संग्राम पाटील याच्यासाठी श्रीपादनगर भागात सापळा रचण्यात आला.

यावेळी त्याच्या घरातून बाहेर आलेल्या संशयित सचिन मांडवकरची झाडाझडती केली. त्यावेळी त्याच्याकडे प्रतिबंधित इंजेक्शनच्या पाच कुप्या मिळाल्या. त्यानंतर पाटील याच्या घराची झडती घेतली. तेथे अशा १८ कुप्या आढळल्या. दोघांकडील अधिक चौकशीत तिसरा संशयित भिसे याच्याकडे देखील अशा कुप्यांचा साठा असल्याचे समजले. (mastermind)त्यालाही ताब्यात घेऊन त्याच्या घरी झडती घेतली तेव्हा अशा २९ कुप्या आणि रोख ६० हजार रुपये मिळाले.

कारवाईत २१ हजार ९६४ रुपयांच्या मेफफेंटर्मीन सल्फेट या इंजेक्शनच्या ५२ कुप्या, रोख ६० हजार रुपये, ४५ हजारांचे तीन मोबाईल, दोन दुचाकी असा एकूण दोन लाख ३६ हजार ९६४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या कारवाईने इचलकरंजीतील नव्या स्वरूपाच्या नशेच्या बाजार उघड झाला आहे. पोलिस उपाधीक्षक समीरसिंह साळवे, निरीक्षक महेश चव्हाण, गुन्हे शोध पथकातील अनिल पाटील, सुनील पाटील, फिरोज बेग, अमर शिरढोणे, बाजीराव पोवार, आदित्य दुंडगे, ताहीर शेख आदींनी ही कारवाई केली.

पोलिस कारवाईची माहिती मिळताच टोळीतील आणखी एक संशयित पसार झाला आहे. (mastermind)त्याचे नाव तपासात पुढे आले असून तो या इंजेक्शन विक्री साखळीतील महत्त्वाचा दुवा असल्याचे उघड झाले आहे. त्याच्या अटकेनंतर टोळीच्या नेटवर्कचा मोठा खुलासा होण्याची शक्यता आहे.या टोळीचा मुख्य सूत्रधार संग्राम पाटील असल्याचे उघड झाले आहे. त्याच्या घरातूनच साखळी शहरभर चालत होती. अनेक दिवसांपासून पोलिस त्याच्यावर पाळत ठेवून होते. अखेर मांडवकर घराबाहेर पडताना हाती लागला आणि पोलिसांनी छापा टाकत एकामागोमाग दोघांना पकडले.

हेही वाचा :