भारतातील अहमदाबाद लंडन विमान दुर्घटनेनंतर जगभरातील विमान अपघात चर्चेत आले आहेत.(crashes) भूतकाळात अनेक विमान दुर्घटना घडल्या आहे. मात्र, एक विमान दुर्घटना जगातील सर्वात मोठे रहस्य बनले आहे. मलेशियाचे MH370 विमान 20,000 फूट खोल समुद्रावरुन गायब झाले. ही घटना खूपत भयानक आहे. या विमानाचे तसेच विमानातील 239 प्रवाशांचे काय झाले? हे जाणून घेतल्यावर धक्का बसेल.
मलेशिया एअरलाइन्सच्या फ्लाइट MH370 चा शोध पुन्हा सुरू होणार आहे. सन 2014 मध्ये हे विमान 239 प्रवाशांसह बेपत्ता झाले होते. मलेशिया सरकारने या मोहिमेसाठी टेक्सासस्थित मरीन रोबोटिक्स कंपनी ओशन इन्फिनिटीला अंतिम मान्यता दिली आहे. हे शोध अभियानात विमानाचे अवशेष सापडले नाहीत तर कंपनीला पैसे दिले (crashes) जाणार नाहीत. जर अवशेष सापडला तर कंपनीला 70 दशलक्ष डॉलर दिले जातील.
ओशन इन्फिनिटीने यापूर्वी 2018 मध्ये एक अयशस्वी शोध मोहीम राबवली होती. यावेळी, कंपनी दक्षिण हिंद महासागरातील 15,000 चौरस किलोमीटरच्या नवीन भागात शोध घेईल. मलेशिया सरकार या प्रयत्नातून बेपत्ता प्रवाशांच्या कुटुंबियांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. सन 2014 मध्ये मलेशिया एअरलाइन्सचे MH370 हे विमान क्वालालंपूरहून बीजिंगला निघाले होते. या विमानात एकूण 239 प्रवासी होते. उड्डाणादरम्यान ते व्हिएतनामच्या हवाई हद्दीतून जात असताना अचानक विमानाचा संपर्क तुटला. उपग्रह डेटा विश्लेषणाच्या आधारे, असे मानले जाते की हे विमान पश्चिम ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्यावरील दक्षिण हिंद महासागरात कोसळले. तथापि, यासंदर्भात केलेल्या दोन मोठ्या शोधांमध्ये कोणताही ठोस निष्कर्ष निघालेला नाही. विमानाचे काहीच अवशेष येथे सापडले नाहीत.
विमानाने उड्डाणानंतर 40 मिनिटांनी शेवटचा सिग्नल पाठवला. जेव्हा ते व्हिएतनामी हवाई हद्दीत पोहोचले(crashes) तेव्हा कॅप्टन जहारी अहमद शाह यांचा शेवटचा संदेश होता, “शुभ रात्री, मलेशियन तीन सात शून्य.” यानंतर लगेचच, विमानाच्या ट्रान्सपॉन्डरने काम करणे थांबवले, ज्यामुळे त्याचा मागोवा घेणे कठीण झाले. लष्करी रडारनुसार, विमानाने अचानक उड्डाणाची दिशा बदलली आणि उत्तर मलेशिया आणि पेनांग बेटावरून अंदमान समुद्राकडे वळले. नंतर ते इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटाच्या टोकावर पोहोचले आणि तिथून दक्षिणेकडे वळताच, सर्व संपर्क पूर्णपणे तुटला.
अशा प्रकारचा अपघात यापूर्वीही घडला आहे. एअर फ्रान्सचे विमान AF447 देखील अपघाताचे बळी ठरले. 1 जून 2009 रोजी हे विमान रिओ दि जानेरो येथून पॅरिसला जात होते. या विमानात एकूण 12 क्रू मेंमबरसह २२८ लोक होते. उड्डाणादरम्यान, विमान अटलांटिक महासागरावरून अचानक रडारवरून गायब झाले. चार वर्षांच्या सखोल शोध आणि तपासानंतर, या अपघाताचे कारण तांत्रिक बिघाड तसेच वैमानिकाच्या चुकीच्या प्रतिक्रिया असल्याचे निष्पन्न झाले.
हेही वाचा :
- भारतीय महिला संघ इंग्लंडविरुद्ध सलग दुसरी मालिका जिंकण्यासाठी सज्ज! मालिकेत टीम इंडीयाची 1-0 अशी आघाडी
- 20 जुलै रोजी रविवारी तिन्ही मार्गांचा मेगाब्लॉक, प्रवास करण्यापूर्वी ‘हे’ वाचा
- सोन्याच्या दरात मोठी वाढ, चांदीच्या भावात घसरण! जाणून घ्या आजच्या किंमती
- वैष्णवी हगवणे न्यायप्रकरणी मोठा ट्विस्ट! IPS सुपेकर सहआरोपी करण्याच्या शिफारशीने खळबळ