अखेर चाहत्यांची प्रतीक्षा संपली! ‘War 2’ चा ट्रेलर रिलीज

अखेर प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली आहे आणि हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर यांच्या या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपट ‘वॉर २’ चा ट्रेलर आज प्रदर्शित झाला आहे. ट्रेलरमध्ये हृतिक आणि ज्युनियर एनटीआर यांच्यातील जोरदार टक्कर दाखवण्यात आली आहे, ज्यामुळे हे सिद्ध होते की चित्रपटात दोघांमध्ये उच्च दर्जाची अ‍ॅक्शन पाहायला मिळत आहे. चित्रपटाचा ट्रेलर(trailer ) प्रदर्शित होताच तो आता सोशल मीडियावरही व्हायरल होऊ लागला आहे. तसेच या दोन अभिनेत्याची केमिस्ट्री पाहण्यात मज्जा येणार आहे.

‘वॉर २’ च्या ट्रेलरमध्ये(trailer ) हृतिक आणि ज्युनियर एनटीआरसह चित्रपटातील संपूर्ण कलाकारांची झलक दाखवण्यात आली आहे. ज्यामध्ये चित्रपटाची मुख्य अभिनेत्री कियारा अडवाणी देखील आहे. ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर, आता चित्रपटाबद्दल लोकांचा उत्साह आणखी वाढला आहे. तसेच संपूर्ण स्टारकास्ट प्रेक्षकांचं भन्नाट मनोरंजन करणार आहे.

ज्युनियर एनटीआर ‘वॉर २’ मध्ये नकारात्मक भूमिकेत दिसत आहे. ज्युनियर एनटीआर या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. ट्रेलरमध्ये त्याची शैली आणि मजबूत व्यक्तिरेखा पाहून असे दिसते की ‘वॉर २’ हा ज्युनियर एनटीआरसाठी बॉलीवूडमध्ये सुरुवात करण्यासाठी एक चांगला पर्याय आहे. तसेच ज्युनियर एनटीआरचे चाहते त्याचे बॉलीवूड पदार्पण पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

‘वॉर २’ हा यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्सचा भाग आहे. ‘वॉर २’ हा २०१९ मध्ये आलेल्या ‘वॉर’चा पुढचा भाग आहे. ‘वॉर’ मध्ये टायगर श्रॉफ हृतिक रोशनसोबत मुख्य भूमिकेत दिसला होता. यावेळी, ज्युनियर एनटीआर ‘वॉर २’ मध्ये हृतिक रोशनसोबत टक्कर देताना दिसणार आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘वॉर २’ हा चित्रपट स्वातंत्र्यदिनाच्या एक दिवस आधी १४ ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा :