काही चित्रपट असे असतात, ज्यांची कुठलीच मार्केटिंग किंवा प्रमोशन होत नाही तरीदेखील बॉक्स ऑफिसवर ते सुपर डुपर हिट ठरतात. असाच एक चित्रपट(film) म्हणजे सैयारा. आज प्रत्येक तरुणाच्या इंस्टाग्राम स्टोरीवर सैयारा चित्रपटाची रील किंवा पोस्ट शेअर करत आहे.
आतापर्यंत सैयारा चित्रपटाने 165.46 कोटी रुपये कमावले आहेत. तरुणाईला तर अक्षरशः या चित्रपटाने(film) वेड लावले आहे. कित्येक तरुण तरुणींचे रडतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, अजून एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. खरंतर, मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये सैय्यारा चित्रपट पाहिल्यानंतर दोन तरुण त्यांच्या गर्लफ्रेंडवरून हातापायीवर उतरले. त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने सिनेमा हॉलबाहेर या दोन तरुणांमधील भांडणाचा व्हिडिओ मोबाईलवर बनवला आणि नंतर तो सोशल मीडियावर व्हायरल केला.
असे सांगितले जात आहे की, हे तरुण ग्वाल्हेरच्या पाडाव पोलिस स्टेशन परिसरातील डीबी मॉलच्या सिनेमा हॉलमध्ये ‘सैयारा’ हा चित्रपट(film) पाहण्यासाठी पोहोचले होते. चित्रपट पाहिल्यानंतर, हे तरुण सिनेमा हॉलमधून बाहेर पडले असतानाच त्यांच्यात गर्लफ्रेंडवरून वाद झाला.
त्या दोन्ही तरुणांमधील वाद इतका वाढला की त्यांनी सिनेमा हॉलबाहेर एकमेकांना लाथा-बुक्क्या मारायला सुरुवात केली. कधी एक दुसऱ्याला जमिनीवर फेकायचा तर कधी दुसरा पहिल्याला फेकायचा. दोघांमधील भांडण पाहण्यासाठी तिथे चांगलीच गर्दी जमली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने हाणामारीची ही घटना मोबाईलमध्ये कैद केली. नंतर ती सोशल मीडियावर अपलोड केली.
आश्चर्याची बाब म्हणजे या मारहाणीच्या घटनेबाबत पोलिसांकडे कोणतीही अधिकृत तक्रार दाखल केलेली नाही. व्हायरल व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसून येते की दोन्ही तरुण रागाच्या भरात एकमेकांवर हल्ला करत आहेत आणि लाथा-बुक्क्यांचा वर्षाव चालू आहे.
काही लोक त्यांच्यात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करतात पण दोघेही शांत होत नाहीत. त्याच वेळी, हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये लोक प्रतिक्रिया देखील देत आहेत. एकाने लिहिले – सैयाराचा दुष्परिणाम. दुसऱ्या युझरने लिहिले – भाऊ गर्लफ्रेंड कुठे आहे? दुसऱ्याने लिहिले – ही मुलं काय मूर्खपणा करत आहेत. तेही मुलीसाठी.
हेही वाचा :