‘आलोच…’ म्हणत जसप्रीत बुमराहनं पत्नीसमोरून काढला पळ, Video Viral

टी20 वर्ल्डकप स्पर्धेमध्ये अटीतटीच्या सामन्यात अखेर भारतीय(Video) संघानं पाकिस्तानच्या संघावर 6 धावांनी मात केली. भारतीय खेळाडूंनी खऱ्या अर्थानं पाकच्या हाती गेलेला विजय हिसकावून आणला असं म्हणायला हरकत नाही. Group A मधील दुसऱ्या सामन्यात भारतापुढं पाकिस्तानचं आव्हान होतं. या सामन्यामध्ये खरा हिरो ठरला तो म्हणजे गोलंदाज जसप्रीत बुमराह.

14 धावा देऊन पाकचे तीन खेळाडू(Video) बाद करणाऱ्या बुमराहनं भारतीय विजयामध्ये मोलाचा वाटा उचलला. असा हा बुमराह सामनावीरही ठरला. ज्यानंतर लगेचच त्याची मुलाखतही पार पडली. ही मुलाखत खास होती, कारण मुलाखत खुद्द जसप्रीतच्या पत्नीनंच घेतली होती.

संजनाच्या प्रश्नांची उत्तरं देताना जसप्रीतनं न्यूयॉर्कमध्ये भारतीय संघानं नेमकी कशी कामगिरी केली, इथपासून गोलंदाजीमध्ये त्याला नेमकी कशाची मदत झाली इथपर्यंतची माहितीही दिली. या संपूर्ण मुलाखतीमध्ये जसप्रीतच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद पाहायला मिळाला. कारण, समोर होतं त्याचं हक्काचं माणूस.

‘माझ्यासाठी सर्वात मोठा आनंद तेव्हा असतो जेव्हा एखादी अडचण माझ्यासमोर येते आणि त्यावर मी तोडगा कसा काढतो. शेवटी फार विचार करण्यापेक्षा मी, स्वत:ला आणि माझ्या संघाला कशी मदत करू शकेन यावर जास्त भर देत असतो आणि मला आनंद आहे की आजही मी ते करु शकलो. पण, मी सामन्यात विरोधी संघाचाच विचार करत होतो असं काही नव्हतं…’, असं बुमराह संजनाच्या प्रश्नाचं उत्तर देत म्हणाला.

मुलाखतीत संजनाच्या प्रश्नांना उत्तरं देणाऱ्या जसप्रीतचा चेहरा भलताच खुलला होता. याच मुलाखतीच्या शेवटी संजनानं बुमराह आणि संपूर्ण भारतीय संघाला स्पर्धेतील दुसऱ्या विजयासाठी शुभेच्छा दिल्या आणि थोड्याच वेळात आपण त्याला भेटणार असल्याचं सांगितलं. ज्यावर उत्तर देताना त्यानं काही क्षण थांबत, ‘धन्यवाद… मी आलोच 30 मिनिटांमध्ये’ असं म्हटलं आणि संजना पुढे काही बोलणार त्याआधीच तो फ्रेमच्या बाहेर गेला.

जसप्रीत आणि संजनाच्या या केमिस्ट्रीनं नेटकरी आणि क्रिकेटप्रेमींचं इतकं लक्ष वेधलं की, शेवटच्या काही मिनिटांच्या त्या गोड संवादासाठी हा व्हिडीओ वारंवार पाहिला जात आहे. प्रेमाचं माणूस समोर असण्याचा आनंद आणि त्याच्यासोबतचं नातं सुरेखरित्या सर्वांसमोर मांडण्यासाठी मिळालेली संधी जसप्रीतन इथं वाया जाऊ दिली नाही… हो ना?

हेही वाचा :

मोदी 3.0 च्या शपथविधीनंतर शेअर बाजारात ऐतिहासिक उच्चांक…

सोनाक्षी सिन्हा बॉयफ्रेंड जहीरसोबत अडकणार लग्नबंधनात

‘जीव माझा गुंतला’ फेम योगिता चव्हाण व सौरभ चौघुले यांनी घेतलं हक्काचं घर.