धक्कादायक! बिल्डरने स्वतःवरच झाडल्या गोळ्या
पुण्यात धक्कादायक गुन्हेगारी घटना घडण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे.(builder) कधी गोळीबार, कधी कोयता गँगची दहशत, खूनखराबा यांमुळे पुणे पार हादरुन गेलं आहे. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना पुण्याच्या नऱ्हे परिसरात घडली आहे. पुण्यात एका तरुण बांधकाम व्यावसायिकाने स्वतःच्या कार्यालयात डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
फ्लॅट आणि प्लॉट विक्री तसेच खरेदी करणाऱ्या एक ३१ वर्षीय बिल्डर तरुणाने पुण्यातील सिंहगड रोड परिसरातील नऱ्हे येथील त्याच्या कार्यालयात डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. मयूर सुनील नरे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. मयूर हा जांभुळवाडी परिसरात कुटुंबासोबत राहत होता. तो विवाहित होता. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मयूरचे(builder) नऱ्हे येथील गावगाडा हॉटेलच्या शेजारील इमारतीत चौथ्या मजल्यावर ऑफिस होते. मयूर रविवारी रात्री घरीच आला नाही. त्यामुळे त्याचा भाऊ त्याच्या कार्यालयात पोहोचला. यावेळी मयूरने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याचं दिसून आलं. लागलीच ही माहिती सिंहगड रोड पोलिसांना देण्यात आली. त्यानुसार सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विजय कुंभार व सहाय्यक निरीक्षक यादव व पथकाने घटनास्थळी पोहोचले. मयूरने आत्महत्या का केली, याचं कारण समजू शकलेलं नाही.
मयूरजवळ सुसाईड नोट (builder)आढळून आलेली नाही, मात्र त्याने आत्महत्येपूर्वी काही हिशोब कागदावर लिहून ठेवला. त्याचबरोबर कोणाकडून किती पैसे येणे आहे, ती कोणाला किती देणे आहे, अशी माहिती असल्याचे सहाय्यक निरीक्षक यादव यांनी सांगितले. मयूरच्या आत्महत्येने त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तसेच जांभुळवाडी परिसरात शोककळा पसरली आहे.
हेही वाचा :
लग्नावरून वाद टोकाला गेला, प्रियकराकडून प्रेयसीची डोक्यात दगड घालून हत्या
आलमट्टी धरणाच्या पाण्यामुळं कोल्हापुरात पुराची समस्या
जातीतील मुलीशी प्रेमविवाह तरीही बापाने मुलाला संपवले