ऑनलाईन ऑर्डर केलेल्या Ice cream कोनमध्ये आढळला तुटलेल्या बोटाचा तुकडा
मुंबईत मुंबईतील मालाड परिसरात एक धक्कादायक(ice cream) घटना घडली आहे. आईस्क्रीमच्या कोनमध्ये मानवी बोटाचा तुकडा सापडला आहे. मलाड पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे. पोलिसांनी तात्काळ ते मानवी बोट फॉरेन्सिककडे पाठवण्यात आले आहे. आईस्क्रीम ज्या ठिकाणी बनवले आणि पॅक केले त्याचाही शोध घेण्यात येणार असल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
मलाडमधील एका महिलेने(ice cream) यम्मो कंपनीचं (EMOI) आईस्क्रीम ऑनलाईन मागवले होते. पण तिने ते खायला सुरुवात करताच तिच्या समोर मानवी बोटाचा तुकडा दिसला. आईस्क्रीम कोनमध्ये बोटाचा तुकडा पाहातच ती महिला ओरडू लागली आणि बेशुद्ध पडली. काहीक्षण तिच्या कुटुंबातील लोकांनाही काहीच समजलं नाही. पण त्यांना सर्व प्रकार समजल्यानंतर तात्काळ मलाड पोलीस ठाणे गाठले.
ओरलेम येथील रहिवासी ब्रेंडन सेराओ (27) यांनी बुधवारी ऑनलाइन डिलिव्हरी ॲपद्वारे यम्मो कंपनीचा आईस्क्रीम कोन ऑर्डर केला होता. त्या महिलेने सांगितले की, आईस्क्रीम कोनमच्या आत सुमारे 2 सेमी लांब मानवी बोटाचा तुकडा होता. सेराओ हे व्यवसायाने एमबीबीएस डॉक्टर आहेत. त्यांनी याबाबत तात्काळ पोलिसांत धाव घेत आपली तक्रार दाखल केली.
Maharashtra | A woman found a piece of human finger inside an ice cream cone that was ordered online in the Malad area of Mumbai. After which the woman reached Malad police station. Malad police registered a case against the Yummo ice cream company and sent the ice cream for…
— ANI (@ANI) June 13, 2024
पोलिसांनी याबाबत लेखी तक्रार दाखल केली आहे. यम्मो आईस्क्रीम कंपनीविरोधात मलाड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आईस्कीम कोनमध्ये आढळलेले मानवी बोट मलाड पोलिसांनी फॉरेन्सिक विभागाकडे तपासणीसाठी पाठवले आहे. पोलीस याप्रकरणाचा तपास कत आहेत.
हेही वाचा :
विधानसभेत संजय मंडलिक कोणाचा फेडणार पैरा? मुश्रीफ की घाटगे?
मनोज जरांगे यांची सरकारला डेडलाईन, उद्या 5 वाजेपर्यंत निर्णय घ्या, अन्यथा…
वाढदिवसाच्या मध्यरात्री PUBG च्या नादात 17 वर्षीय मुलाचा मृत्यू