‘…अन्यथा तुमचं सरकार अडचणीत येईल’, भाजप नेत्याचा CM शिंदेंना इशारा
आपल्या वक्तव्यामुळे कायम चर्चेत असणारे भाजप नेते मोहित कंबोज पुन्हा (government)एकदा चर्चेत आले आहेत. त्यांनी सोशल मिडीया एक्सवरती एक पोस्ट शेअर करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना इशारा दिला आहे. पोस्टमध्ये कंबोज यांनी मुंबई महानगरपालिकेतील एक AMC भ्रष्टाचाराचे सगळे रेकॅार्ड तोडत आहे.
महानगरपालिकेतील या भ्रष्ट अधिकाऱ्याला तुम्ही तात्काळ नोटीस(government) द्या. भ्रष्टाचार कंट्रोल करण्याची हिच योग्य वेळ आहे. त्याचबरोबर एका अधिकाऱ्यामुळे तुमचं सरकार अडचणीत येईल, असं आपल्या पोस्टमध्ये भाजप नेते मोहित कंबोज यांनी म्हटलं आहे.
भाजप नेते मोहित कंबोज यांनी एक्स या सोशल मिडियावर मुंबई महापालिकेतील अतिरिक्त आयुक्तांवर भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आलेला आहे. कंबोज यांच्या या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून अधिकाऱ्याचे नाव पुराव्यासह उघड करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. कंबोज यांच्या पोस्टनंतर मुंबई महानगरपालिकेतील तो अधिकारी नेमका कोण आहे याबाबतची जोरदार चर्चा सध्या सुरु झाली आहे.
मुंबई महानगरपालिकेतील एक AMC भ्रष्टाचाराचे सर्व रेकॅार्ड तोडत आहे. महानगरपालिकेतील या भ्रष्ट अधिकाऱ्याला तात्काळ नोटीस द्या. या एका अधिकाऱ्यामुळे तुमचं सरकार अडचणीत येईल. या अधिकाऱ्याचा भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावर वाढला असून त्याचे तोंड म्हणजे गटार आहे. त्याला कंट्रोल करण्याची ही योग्य वेळ आहे, असं मोहित कंबोज यांनी म्हटलं आहे. या पोस्टमध्ये त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टॅग केले आहे.
मोहित कंबोज यांनी पुन्हा एक पोस्ट करत पुढे म्हटले आहे की, महानगरपालिकेतील या भ्रष्ट अधिकाऱ्याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करणार तक्रार आहे. या अधिकाऱ्याचे नाव पुराव्यासह देणार आहे. कंबोज यांच्या पोस्टमुळे मोठी खळबळ उडाली असून तो अधिकारी नेमका कोण याची जोरदार चर्चा सुरु आहे.मात्र, अद्याप एकनाथ शिंदेंकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
हेही वाचा :
अजित पवारांच्या अडचणीत भर? अण्णा हजारे पुन्हा सक्रीय
मैं लवली हो गई यार… विमानतळावर महिलेचा भन्नाट डान्स Video viral
आता लाईटबिलचं नो टेन्शन, मनसोक्त वापरा वीज; केंद्र सरकाराच्या ‘या’ योजनेसाठी असा करा अर्ज