पाठदुखीचा त्रास खरंच कमी होतो का? मिठाच्या पाण्याने अंघोळ केल्याने!
ऑफिसमध्ये तासन् तास बसून काम केल्यामुळे आणि एका ठरावीक पद्धतीत बसल्यामुळे हल्ली अनेकांना पाठदुखीचा (back pain)त्रास जाणवतोय. या पाठदुखीच्या समस्येवर अनेक उपाय केले जातात; पण काही फरक जाणवत नाही. डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या खाल्ल्यानंतर तात्पुरते बरे वाटते; पण काही दिवसांनी पुन्हा ही समस्या डोके वर काढते. अशा वेळी अनेक जण काही घरगुती उपाय करण्याचा सल्ला देतात. त्यातील एक उपाय म्हणजे मिठाच्या पाण्याने अंघोळ करणे. रोज पाण्यात मीठ घालून अंघोळ केल्यास पाठदुखीपासून आराम मिळतो, असे काही जण सुचवतात. पण, या उपायामुळे खरोखरच काही फायदा होऊ शकतो का, असा प्रश्न अनेकांना पडतो. याच प्रश्नावर दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना काही डॉक्टरांनी सविस्तर उत्तर दिले आहे, ते नेमके काय आहे ते जाणून घेऊ….
तुम्ही आतापर्यंत मिठाच्या पाण्याने गुळण्या करण्याचे फायदे ऐकले असतील; पण त्या पाण्याने अंघोळ करण्याचेही काही फायदे असतात हे फार क्वचित लोकांना माहीत आहे. याच विषयावर मॅक्स हॉस्पिटलचे ऑर्थोपेडिक्स आणि जॉइंट रिप्लेसमेंट असोसिएट डायरेक्टर डॉ. अखिलेश यादव यांनी दी इंडियन एक्स्प्रेसशी संवाद साधताना म्हटले की, पाठदुखीचा त्रास असलेल्यांना मिठाच्या पाण्याने अंघोळ केल्याने फायदा होऊ शकतो. त्यातही विशेषत: सैंधव मिठाच्या पाण्याने अंघोळ केल्यास अधिक फायदा होईल.
हेही वाचा :
‘छगन भुजबळांच्या घरवापसीची जोरदार चर्चा, परतीच्या संकेताबाबत प्रश्न विचारताच शरद पवार म्हणाले….
मिर्झापूर ३’ चा खतरनाक ट्रेलर पाहिलात का? VIDEO
क्रिकेट विश्वाला मोठा धक्का! भारताच्या स्टार खेळाडूने आत्महत्या करत संपवलं जीवन