पेपरफुटी रोखण्यासाठी ’10 मिनिटं फॉर्म्युला’;पोलिसांनी सांगितला तोडगा

सध्या देशभरात अनेक पेपर (exam)फुटीची प्रकरणं गाजत आहेत. यांपैकी डॉक्टर बनण्याची ही परीक्षा वादात आडकली आहे, सध्या याचा वाद सुप्रीम कोर्टात आहे. यावरुन देशभरात विविध ठिकाणी विद्यार्थ्यांची आंदोलनं सुरु आहेत.

तसंच आता १८ जून रोजी युजीसी नेटच्या परीक्षेचाही पेपर फुटल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर ही परीक्षाच एनटीएनं रद्द केली आहे. पण अशा प्रकारच्या वाढत्या पेपर(exam) फुटीच्या घटना रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांना एक फॉर्म्युला सापडला आहे. याला त्यांनी ‘१० मिनिटं फॉर्म्युला’ असं म्हटलं आहे.

दिल्ली पोलिसांचे विशेष पोलीस आयुक्तपदावरुन निवृत्त झालेले डॉ. मुक्तेश चंद्र यांच्यासमोर अशा प्रकारची पेपरफुटीची अनेक प्रकरणं आली होती. त्यामुळं अशी पेपरलीकची प्रकरणं रोखता येऊ शकतात असं त्यांनी म्हटलं आहे. फक्त मजबूत इच्छाशक्तीनं १० मिनिटं फॉर्मुला लागू करावा लागेल असं त्यांनी म्हटलं आहे. अमर उजालानं याबाबत वृत्त दिलं आहे.

१० मिनिटं फॉर्म्युला काय?

आता हा १० मिनिटं फॉर्म्युला काय आहे? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल? तर मुक्तेशचंद्र सांगतात, “हा फॉर्म्युला म्हणजे पेपर (exam)सेट करण्यापासून तो परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचवण्यापर्यंतची प्रक्रिया शंभर टक्के इलेक्ट्रॉनिकली झाली पाहिजे. या प्रक्रियेत पेपर जितका जास्त हाताळला जाईल तितकीच पेपर लीकची शक्यता वाढते. त्यासाठी पेपर जर इलेक्ट्रॉनिकली सेट करण्यात आला की त्याला इलेक्ट्रॉनिकलीच लॉक करायला हवा. याचा पासवर्ड परीक्षा सुरु होण्यापूर्वी १० मिनिटं आधी सुरक्षित एमएमएस किंवा ईमेल आयडीवर पाठवण्यात यावा. परीक्षा केंद्रांमध्ये एक किंवा त्यापेक्षा अधिक प्रिटिंग मशिन ठेवता येऊ शकतात. प्रिटिंगमशीन जर मोठी असेल तर सात आठ मिनिटांमध्ये २००हून अधिक प्रिंट छापून तयार होऊ शकतात. त्यानंतर परीक्षार्थींना पेपरचं वाटप करण्यात यावं. यानंतर पेपर फुटीची कुठलीच शक्यता राहणार नाही,”

हेही वाचा :

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर

भयानक हत्याकांड दिल्लीत बर्गर किंगमध्ये 40 गोळ्या घालून तरुणाला केलं ठार

१० वी आणि १२ वी नंतर काय करावं?; जाणून घ्या मार्गदर्शन शिबिरातून..