राज्यात पुढील ३-४ तासांत मेघगर्जनेसह कोसळणार पाऊस

भारतीय हवामान (weather)खात्याने पुढील ३-४ तासांत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

यंदा मान्सून मुंबईसह महाराष्ट्रात वेळेआधी दाखल झाला होता. पहिल्या दोन दिवस पावसाच्या जोरदार सरी बरसल्यानंतर मागील १० दिवसांपासून पावसाने उघडीप घेतली होती. पेरण्या खोळंबल्याने शेतकरी पावसाची आतुरनेने वाट पाहत होते.

त्यानंतर गुरुवारी (ता. २० जून) पावसाने जोरदार पुनरागमन केले. मुंबई, पुणे ठाण्यासह राज्यातील अनेक भागात पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. येत्या २४ तासांतही पावसाची हीच स्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.

हेही वाचा :

वट सावित्रीच्या व्रताला बनवा हेल्दी अन् टेस्टी डोसा उपवासही घडेल अन् पोटही भरेल

मराठा आरक्षणाचे भवितव्य टांगणीला? १० टक्के आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकेल का?

आंतरराष्ट्रीय योग दिन, योग म्हणजे ईश्वराशी एकरूपता.