१० वी पास उमेदवारांसाठी रेल्वेत नोकरीची मोठी संधी
रेल्वेमध्ये नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या लोकांसाठी नोकरीची(job search) मोठी संधी आहे. रेल्वेमध्ये १० वी पास लोकांसाठी भरती केली जात आहे. रेल्वे इंटिग्रल कोच फॅक्टरीने जवळपास १००० हून अधिक शिकाऊ पदांसाठी भरती जाहीर केली आहे. यासाठी रेल्वेने अर्ज करण्यास सांगितले आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ जून म्हणजे आज आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
रेल्वे इंटिग्रल कोच फॅक्टरी म्हणजेच ICF चेन्नईच्या शिकाऊ पदांसाठी ही भरती(job search) आहे. यासाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. यासाठी तु्म्हाला pb.icf.gov.in या वेबसाइटवर भेट द्यावी लागेल. तेथे दिलेल्या लिंकवर जाऊन तुम्हाला अर्ज करावा लागेल. रेल्वेत जवळपास १०१० शिकाऊ पदे भरती केली जाणार आहे. यामध्ये वेल्डर, फिटर, सुतार, मेकॅनिक आणि इलेक्ट्रिशियन या पदांचा समावेश आहे.
या पदभरतीसाठी कोणत्याही प्रकारची परिक्षा घेतली जाणार नाही. तुमच्या दहावीच्या गुणांच्या आधारावर या नोकरीसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. अर्ज करणारा उमेदवार किमान ५० टक्के गुणांसह दहावी पास झालेला असावा. फ्रेशर्ससाठी ही पात्रता आहे. तसेच आयटीआय डिप्लोमा झालेले लोकदेखील या योजनेत अर्ज करु शकणार आहेत.
अर्ज करण्यासाठी उमेदवारांना १०० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. राखीव प्रवर्ग, महिला उमेदवार आणि पीएच उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागणार आहे.या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना ६ हजार ते ७ हजार रुपयांची स्टायपेंड दिली जाईल. यासंबंधित माहिती रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेली आहे.
हेही वाचा :
श्रद्धा कपूर राहुल मोदीशी करणार लग्न…?
चोरी करताना पाहिले म्हणून विद्यार्थ्याचा दगडाने ठेचून खून
माझ्यावर जीवघेणा हल्ला करण्याचा कट, आमदार बच्चू कडू यांचं पोलीस अधीक्षकांना पत्र