धक्कादायक! भाजप संशयाच्या फेऱ्यात? अध्यक्षांनीच केला भांडाफोड
कांदा खरेदीत नाफेड कडून घोटाळा होत आला आहे. याबाबत विरोधकांकडून सातत्याने भारतीय जनता पक्षाला(president) लक्ष्य केले जात होते. आता त्याला ‘नाफेड’च्या अध्यक्षांकडूनच अप्रत्यक्ष दुजोरा मिळाला आहे. नाफेडचे अध्यक्ष जेठाभाई अहिर यांनी यांनी शुक्रवारी नाशिकच्या विविध कांदा खरेदी केंद्रांना अचानक भेट दिली. त्यांच्यासोबत नाफेडचे अधिकारीही होते. यावेळी नाफेडच्या विविध खरेदी केंद्रांवर नियमबाह्य पद्धतीने कामकाज होत असल्याचे उघड झाले.
नाशिकच्या कांदा खरेदीत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार(president) होत असल्याचा आरोप काँग्रेससह विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केला होता. यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांचा देखील सहभाग असल्याचा आरोप केला जात होता. मात्र केंद्र सरकारने त्याची दखल घेतली नव्हती.
या प्रश्नावर कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये देखील मोठा असंतोष आहे. शुक्रवारी नाफेडचे अध्यक्ष जेठाभाई अहिर यांनी विविध कांदा खरेदी केंद्रांना भेट दिली. त्यात नाफेडचे अधिकारी शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करत नव्हते. व्यापारी आणि मध्यस्थांमार्फत खरेदी करत असल्याचे आढळले.
नाफेडने कांदा व्यापार नियमित करण्यासाठी आणि दर नियंत्रणासाठी शेतकऱ्यांकडून खरेदी करणे अपेक्षित आहे. ही संस्था शेतकऱ्यांच्या मदतीसाठी स्थापन करण्यात आली आहे. प्रत्यक्षात तसे घडत आलेले नाही. त्यामुळे यामध्ये मोठा गैरव्यवहार झाल्याचा संशय आहे.
हा गैरव्यवहार तपासण्यासाठी अधिकाऱ्यांची समिती गठित करण्यात येणार आहे. त्यामुळे नाफेडच्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. यातील दोषींवर तात्काळ आणि कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे अहिर यांनी हा गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर सांगितले.
हेही वाचा :
१० वी पास उमेदवारांसाठी रेल्वेत नोकरीची मोठी संधी
धक्कादायक ! प्रेमात अडथळा ठरणाऱ्या पोटच्या मुलांनाच आईनं संपवलं
ईडीचा दणका! दिल्ली उच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांची सुटका थांबवली