चक्क 30 वर्षीय महिलेने केले 15 वर्षाच्या मुलाशी लग्न व्हिडीओ व्हायरल
सोशल मीडियावर रोज काही ना काही व्हायरल होत असते. (surprised)अनेकदा असे व्हिडीओ व्हायरल होतात जे पाहून हसू आवरता येत नाही. तर अनेकदा असे व्हिडीओ व्हायरल होतात जे पाहून आश्चर्याचा धक्का बसतो. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.एका 30 वर्षीय महिलेने 15 वर्षांच्या मुलाशी लग्न करण्याचा दावा या व्हिडीओतून केला आहे.
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक रिपोर्टर महिलेला प्रश्न विचारत आहे की, तिने 15 वर्षांच्या मुलाशी लग्न कसे केले. ज्याचे वय तिच्या मुलासारखे आहे. या प्रश्नावर महिलेला राग येतो आणि तिने रिपोर्टरला तेथून हाकलून देण्याचा प्रयत्न करते. तसेच ती त्याला म्हणते की मी माझ्या मर्जीने लग्न केले आहे. तो मुलगा देखील हेच बोलतो. व्हिडिओतील महिला आणि रिपोर्टरमधील संभाषण लोकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर (surprised)अनेक जण आश्चर्य व्यक्त करत आहेत, तर काहीजण याकडे मजेदार दृष्टिकोनातून पाहत आहेत.
सोशल मीडियावर या घटनेबाबत संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत, तर काही लोक महिलेचा निर्णय विचित्र मानत आहेत. तर काहीजण याला त्याच्या वैयक्तिक आयुष्याचा भाग म्हणत तटस्थ राहात आहेत. मात्र, व्हिडिओच्या सत्यतेवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. व्हिडिओ पाहून असे वाटते की तो केवळ मनोरंजनासाठी बनवला गेला आहे. व्हिडिओमधील महिला आणि रिपोर्टरमधील संभाषण काही प्रमाणात स्क्रिप्टेड असल्याचे दिसते, ज्यामुळे लोकांच्या मनात शंका निर्माण होत आहे.
Dehat needs serious elting pic.twitter.com/WeW5UcvDuo
— Hindutva Knight (@HPhobiaWatch) August 21, 2024
हे देखील शक्य आहे की हा व्हिडिओ केवळ व्हायरल होण्याच्या उद्देशाने बनविला गेला आहे.असा व्हिडिओ व्हायरल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. अनेकदा सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी लोक असे व्हिडीओ तयार करतात. ज्याचा उद्देश केवळ व्ह्यू आणि लाईक्स गोळा करणे हा आहे. पण असे(surprised) व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असतात. हा व्हिडीओ कुठला आहे हे कळालेले नाही. पण या व्हिडीओने सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे.
हेही वाचा :
क्रिस्टियानो रोनाल्डोच्या यूट्यूब चॅनलने सुरु करताच गाजवले महाविक्रम..
राज्य सरकारचा मोठा निर्णय: प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरणाची स्थापना, खासदार उदयनराजे भोसले अध्यक्ष