प्रसिद्ध यूट्यूबर रणवीर अल्लाहबादियाला अणखी एक मोठा धक्का

प्रसिद्ध यूट्यूबर(YouTuber) रणवीर अल्लाहबादिया सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोमध्ये त्याने केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे मोठा गोंधळ उडाला आहे. देशभरातील अनेक लोक त्याच्यावर संताप व्यक्त करत असून, सोशल मीडियावर त्याला मोठ्या प्रमाणात विरोध केला जात आहे. तसेच, सरकार आणि पोलिसांनीही या प्रकरणात लक्ष घातले आहे.

या वादानंतर रणवीरच्या लोकप्रियतेला मोठा धक्का बसला आहे. अनेक वर्षांच्या मेहनतीने त्याने कमावलेली प्रतिष्ठा एका वादग्रस्त वक्तव्यामुळे धोक्यात आली आहे. त्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई सुरू असून, त्याला मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे.

सोशल मीडियावर(YouTuber) असा दावा केला जात आहे की भारतीय क्रिकेटर विराट कोहली याने रणवीर अल्लाहबादिया याला इंस्टाग्रामवरून अनफॉलो केलं आहे. याची पुष्टी अद्याप झाली नसली, तरी अनेक चाहते आणि सोशल मीडिया युजर्स यावर चर्चा करत आहेत. काही लोकांचा अंदाज आहे की कोहलीने आधीच रणवीरला अनफॉलो केलं होतं, तर काहींना वाटतं की वादानंतरच हा निर्णय घेण्यात आला.

या वादावर मुंबई पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. खार पोलीस ठाण्यात या प्रकरणी सहा लोकांचे जबाब नोंदवले गेले आहेत. शोचे जज अपूर्वा मुखीजा आणि यूट्यूबर आशीष चंचलानी यांनी आपला जबाब देताना सांगितले की हा शो स्क्रिप्टेड नाही आणि जज व स्पर्धकांना मोकळेपणाने बोलण्याची संधी दिली जाते.

शोमध्ये जजेसना कोणतेही मानधन दिले जात नाही, मात्र त्यांना आपल्या सोशल मीडियावर शोचे कंटेंट पोस्ट करण्याची मुभा असते. तसेच, या शोसाठी प्रेक्षकांना तिकीट घ्यावे लागते, आणि मिळणाऱ्या उत्पन्नातून विजेत्याला बक्षीस दिले जाते. रणवीर अल्लाहबादिया आणि त्याच्या टीमने पोलिसांना कळवले आहे की ते लवकरच त्यांचा जबाब नोंदवण्यासाठी हजर राहतील. त्यामुळे पुढील काही दिवसांत या प्रकरणात आणखी नवी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

मुलं रात्री 2 वाजता उठतात आणि आई-वडिलांना…कपिल शर्माचं ‘ते’ विधान चर्चेत!

व्हॉट्सअ‍ॅपमध्ये जबरदस्त फीचरची एंट्री; इंस्टाग्राम सारखं म्युझिक टूल कसं वापराल? 

‘फार्मर’ आयडी शेतकऱ्यांसाठी फायदेशीर, मिळणार 5 मोफत फायदे