ऐेन निवडणुकीत महायुतीला मोठा धक्का ; आणखी एका बड्या नेत्याचा ठाकरे गटात प्रवेश

विधानसभा निवडणुकीच्या(politics) आधी आणि आचारसंहिता लागल्यानंतर महायुती आणि भाजपला धक्क्यावर धक्के बसत आहेत. काही दिवसांपूर्वी भाजपच्या दोन बड्या नेत्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला होता. त्यानंतर आता भाजपच्या एका बड्या नेत्याने शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. ऐन निवडणुकीत भाजप आणि महायुतीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

विधानसभा निवडणूक (politics)जाहीर झाल्यानंतर राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. त्यातच आज मुंबईतील कुर्ला मतदारसंघातील भाजपचे महामंत्री स्वप्नील येरूनकर यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. भाजपला हा मोठा धोका मानला जात आहे.

स्वप्नील येरूनकर यांच्या पक्षप्रवेशानंतर उद्धव ठाकरे यांनी महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला.“ज्यांनी आपला पक्ष चोरला त्यांच्याकडून तुम्ही आपल्या शिवसेनेत आलात. त्यांना राजकारणात जाळून खाक केल्याशिवाय राहणार नाहीत”, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा :

महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एका पक्षाची एन्ट्री

महागाई नियंत्रणासाठी सरकार घेणार मुकेश अंबानींची मदत

तळीरामांनो सावधान! आता ‘मदिरा’ पिऊन गाडी चालवाल तर…