सरकारकडून सर्वसामान्यांना मिळणार मोठं गिफ्ट, पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त?
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 14 मार्चरोजी इंडियन ऑयल(diesel) कॉर्पोरेशन , भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडआणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती प्रति लीटर दोन रुपयांनी कमी केल्या होत्या. आता लवकरच विधानसभा निवडणुकांचे बिगूल वाजणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा इंधनदरात कपात होण्याची शक्यता आहे.
पेट्रोलच्या दरांना वैश्विक बाजाराच्या किमतींशी 2010 साली जोडण्यात आले होते. तर 2014 मध्ये डिझेलचे(diesel) दर वैश्विक बाजाराशी जोडून नियंत्रणमुक्त करण्यात आले होते. सध्या देशात अनेक राज्यात पेट्रोल हे जवळपास 100 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. तर, डिझेलच्या किमती देखील 90 पेक्षा जास्त प्रति लिटर आहेत.
इंधनाचा दर वाढला की परिवहनापासून ते घरातील किचनपर्यंत त्याचा अनेक घटकांवर परिणाम होतो. विमानवाहतूक तसेच इतर उद्योगही इंधन दरवाढीमुळे प्रभावित होतात.मिळालेल्या माहितीनुसार, आगामी काही दिवसांत इंधनदर कमी होण्याची शक्यता आहे. काही मीडिया रिपोर्टनुसार, गेल्या काही वर्षांत भारतात इंधनाची मागणी वाढली आहे.
कच्च्या तेलाच्या किमतीत कपात करण्यात आल्याने पेट्रोलियम पदार्थांची निर्यात करणारे देश आणि रशियाचे नेतृत्त्व असलेली ओपेक+ या संघटनेने ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांसाठी नियोजित तेल उत्पादनातील वाढ स्थगित केली आहे.
भारत हा जगातील सर्वांत मोठा तिसरा तेल आयात करणारा देश आहे. ही गरज भागवण्यासाठी भारताला 87 टक्के विदेशी स्त्रोतांवर अवलंबून राहावे लागते. अशा स्थितीत भारत आता कच्च्या तेलाची जास्तीत जास्त खरेदी करण्यास तयार आहे. यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात आज 13 सप्टेंबररोजी पेट्रोलची सरासरी किंमत 104.78 रुपये प्रति लिटर आहे. तर, डिझेलची सरासरी किंमत 91.30 रुपये प्रतिलिटर आहे. आता सर्वसामान्यांना इंधनदरात दिलासा मिळणार का, हे आगामी काळात दिसून येईलच.
हेही वाचा:
देवी लक्ष्मीच्या कृपेने ‘या’ 3 राशींच्या आर्थिक समस्या दूर होतील!
कल्याणमध्ये धक्कादायक आत्महत्या: धावत्या लोकलमधून तरुणाचा नाल्यात उडी