हिंदूंच्या संख्येत तब्बल ‘इतक्या’ टक्क्यांची घट; कोणाचा वाढला आकडा?
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक नवनवीन मुद्दे चर्चेचा विषय बनत आहेत. अशातच आता महाराष्ट्रात बटोगे तो कटोगे आणि एक है तो सेफ है या दोन नव्या घोषणांनी प्रचंड धुमाकूळ घालत आहेत(hindus). मात्र आता या दोनही घोषणांनी राज्यातील वातावरण चांगलच तापलं आहे.
राज्यात हिंदू(hindus) आणि मुस्लिम ध्रुवीकरणाचा मुद्दा चर्चेत आहे. कारण मुंबईत हिंदूंची संख्या कमी होत असल्याचा दावा एका रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. यासंदर्भात अधिक माहिती अशी की, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सने याविषयीचा एक अहवाल प्रसिद्ध केला आहे.
त्यानुसार आता मुंबईमध्ये हिंदूंची संख्या 88 ते 66 टक्क्यांवर आली आहे. तसेच या अहवालानुसार, 1961 मध्ये मुंबईत हिंदूची संख्या ही तब्बल 88 टक्के होती. मात्र त्यानंतर 2011 मध्ये तीच संख्या 66 टक्क्यांपर्यंत खाली घसरली आहे. तर या 50 वर्षांत हिंदूंच्या संख्येत केवळ 8 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आल्याचं दिसत आहे.
अहवालानुसार, 1961 मध्ये मुस्लिम लोकसंख्या फक्त 8 टक्के होती. तर 2011 पर्यंत ही लोकसंख्या तब्बल 21 टक्के झाली आहे. मात्र आता लोकसंख्येचे हे गुणोत्तर प्रमाण असेच राहिले तर पुढील 40 वर्षांत हिंदू लोकसंख्या ही 54 टक्क्यांहून अधिकने कमी होण्याची भीती वर्तवण्यात आली आहे. याशिवाय मुंबईमध्ये पुढील 40 वर्षात मुस्लिम लोकसंख्या जवळपास 30 टक्क्यांहून अधिकने वाढण्याची शक्यता या अहवालात वर्तवली आहे.
हेही वाचा :
शुटिंग दरम्यान, सेटवरच बाटलीत लघवी करायचा अभिनेता
“शिंदेंच्या सर्व उमेदवारांना 25 कोटी…”; संजय राऊतांचा गंभीर आरोप
अजितदादांची चिंता वाढली, भाजपच्या बड्या नेत्याचा घड्याळाविरोधात प्रचाराचा इशारा