महाकुंभात भीषण आग, आकाशात काळ्या धुराचे लोट; अनेक तंबू जळून खाक

महाकुंभामध्ये पुन्हा एकदा भीषण आग(fire) लागली. अनेक तंबू जळून खाक झाले आहेत. महाकुंभातील सेक्टर 22 मध्ये हा अपघात झाल्याचं सांगण्यात येतंय. यात कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. महाकुंभात आग लागल्यानंतर घटनास्थळी लोक वेळेत बाहेर पडल्यामुळे मोठी दुर्घटना टळली, असं सांगण्यात येतंय. यावेळी महाकुंभात आग कशी लागली? हा प्रश्न मोठ्या प्रमाणावर उपस्थित होतोय.

महाकुंभाचे सेक्टर 22 झुंसीत छटनाग घाट आणि झुंसीचा नागेश्वर घाट याच्या मध्यभागी येतो. तिथल्या तंबूमध्ये अचानक आग लागली, याची भनक लागताच तंबूतील लोक तातडीने तंबूबाहेर पडले. उपस्थित भाविकांनी स्वतः अग्निशमन दलाला याची माहिती दिली. अग्निशमन दलाने घटनास्थळी आग(fire) विझवण्यास सुरुवात केली. 15 तंबू जळून राख झाल्याचं सांगण्यात येतंय.

गीता प्रेसच्या तंबूतही आग लागली होती. यापूर्वी 19 जानेवारी रोजी महाकुंभातही अशीच आग लागली होती. ही घटना गीता प्रेसच्या तंबूत घडली होती. ती आग इतकी भीषण होती की, सिलेंडरचाही स्फोट झाला. त्या आगीमुळे आकाशात धुराचे लोट होते. घटनास्थळी मोठा गोंधळ उडाला होता. या अपघातानंतर अनेक प्रकारची खबरदारी घेण्यात आली होती, परंतु पुन्हा अशीच घटना पुन्हा घडल्याचं समोर आलंय. आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

मौनी अमावस्येच्या दिवशी महाकुंभात चेंगराचेंगरी झाली. त्या अपघातात 30 भाविकांचा मृत्यू झाला, अनेक जण जखमी झाले आहेत. संगमवर मोठ्या संख्येने गर्दी जमल्यामुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली. तिथे जमिनीवर झोपलेल्या भाविकांनाही आपला जीव गमवावा लागला, असं सांगितलं जातंय. या अपघातात जखमी झालेल्या सर्व भाविकांना सरकारकडून 25 लाख रुपयांची मदत दिली जात आहे.

हेही वाचा :

जरांगेंकडून उपोषण स्थगितीची घोषणा; आता लढाई समोरा-समोर

मित्राचे कपडे काढून प्रायव्हेट पार्टला आयोडेक्स चोळलं, व्हिडिओ काढला अन्…

अभिनेत्रीने 45 व्या वर्षी गुपचूप उरकलं लग्न?; सोशल मीडियावर फोटो व्हायरल