कोल्हापूर जिल्ह्यातील ‘या’ मतदारसंघात बहिणींच्या मतांचा महापूर!

वाढलेल्या मताचा टक्का कोणाला रडवणार आणि कोणाला गुलाल लावणार? (share)याचे उत्तर अवघ्या काही तासांवर आलं आहे. उद्या 23 नोव्हेंबर मतमोजणी होत असून दुपारी बारा वाजेपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यानं पुन्हा एकदा करून दाखवलं राज्यातील सर्वाधिक मतदान झालं आहे. त्यामुळे वाढलेल्या मताचा टक्का कोणाला रडवणार आणि कोणाला गुलाल लावणार? याचे उत्तर अवघ्या काही तासांवर आलं आहे. उद्या 23 नोव्हेंबर मतमोजणी होत असून दुपारी बारा वाजेपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे.


दरम्यान, जिल्ह्यातील आणि राज्यातील सर्वाधिक मतदान करवीर विधानसभा मतदारसंघात झालं आहे. करवीरमध्ये 84.96 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. कोल्हापूर जिल्ह्यात चंदगड विधानसभेला पुरुषांच्या तुलनेत महिलांचं मतदान सर्वाधिक झालं आहे. चंदगड विधानसभेला महिलांची टक्केवारी 75.47 असून पुरुषांची टक्केवारी 74.49 टक्के आहे. कोल्हापूर जिल्ह्यात महिलांच्या 2.78 टक्के मतदानाचा वाढला आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनी कौल कोणाला दिला आहे, याची उत्सुकता ताणली गेली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात एकूण 33 लाख 5 हजार 98 मतदारापैकी 25 लाख 32 हजार 657 मतदारांनी मतदार केले. यामध्ये एकूण 16,69,270 पुरुषांपैकी 12,97,561 पुरुषांनी, 16,35,642 महिलापैकी 12,35,010 महिलांनी व 186 पैकी 86 इतर मतदारांनी(share) मतदान केले, यात पुरुषांची टक्केवारी 77.73, महिलांची टक्केवारी 75.51 तर इतरांची टक्केवारी 46.24 इतकी आहे. या मतदारांची एकूण टक्केवारी 76.63 इतकी आहे.

जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघनिहाय मतदानाची आकडेवारी
चंदगड विधानसभा
पुरुष 163470, महिला 164201 व इतर 9 असे एकूण 327680 मतदार. यापैकी पुरुष 121774 (74.49 टक्के), महिला 123918 (75.47टक्के), व इतर 3 33.33 टक्के, अशा एकूण 245695 (74.98 टक्के) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.


राधानगरी विधानसभा
पुरुष 177302, महिला 167108 व इतर 12 असे एकूण 144422 मतदार. यापैकी पुरुष 140315 (79.14 टक्के) महिला 129365 (77.41 टक्के) व इतर 9 (75 टक्के) अशा एकूण 269689 (78.30 टक्के ) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.


कागल विधानसभा
पुरुष 171356, महिला 172311 व इतर 5 असे एकूण 343672 मतदार. यापैकी पुरुष 143169 (83.55 टक्के), महिला 140395 (81.48 टक्के) व इतर 4 (80 टक्के) अशा एकूण 283568 (82.51 टक्के) मतदारांनी हक्क बजावला.


कोल्हापूर दक्षिण विधानसभा
पुरुष – 187400, महिला 185233 व इतर 51 असे एकूण 372684 मतदार. यापैकी पुरुष 142707 (76.15टक्के), महिला 139007 (75.04 टक्के) व इतर 29 (56.86 टक्के) अशा एकूण 281743 (75.60 टक्के) मतदारांनी हक्क बजावला.


करवीर विधानसभा
पुरुष 168193 महिला 156968 व इतर 0 असे एकूण 325161 मतदार. यापैकी पुरुष 144902(86.15 टक्के), महिला 131343 (83.68 टक्के) व इतर 0 (0 टक्के) अशा एकूण 276245 (84.96 टक्के) मतदारांनी हक्क बजावला.


कोल्हापूर
उत्तर विधानसभा
पुरुष 148809, महिला 152916 व इतर 18 असे एकूण 301743 मतदार. यापैकी पुरुष 100597 (67.60 टक्के), महिला 97059 (63.47 टक्के) व इतर 10 (55.56 टक्के) अशा(share) एकूण 197666 (65.51 टक्के) मतदारांनी हक्क बजावला.


शाहूवाडी विधानसभा
पुरुष 157316, महिला 148923 व इतर 7 असे एकूण 306246 मतदार. यापैकी पुरुष 125620 (79.85 टक्के) महिला 116363 (78.14 टक्के) व इतर 4 (57.14 टक्के) अशा एकूण 241987 (79.02 टक्के) मतदारांनी हक्क बजावला.


हातकणंगले विधानसभा
पुरुष 173449, महिला 168216 व इतर 20 असे एकूण 341685 मतदार. यापैकी पुरुष 136055 (78.44 टक्के) महिला 125145 (74.40 टक्के) व इतर 15 (75 टक्के) अशा एकूण 261215 (76.45 टक्के) मतदारांनी हक्क बजावला.


इचलकरंजी विधानसभा
पुरुष 158721, महिला 153881 व इतर 62 असे एकूण 312664 मतदार. यापैकी पुरुष 111916 (70.51 टक्के) महिला 105927 (68.84 टक्के) व इतर 10 (16.13 टक्के) अशा एकूण 217853 (69.68 टक्के) मतदारांनी हक्क बजावला.


शिरोळ विधानसभा
दक्षिण पुरुष 163254, महिला 165885 व इतर 2 असे एकूण 329141 मतदार. यापैकी पुरुष 130506 (79.94 टक्के) महिला 126488 (76.25 टक्के) व इतर 2 (100 टक्के) अशा एकूण 256996 (78.08 टक्के) मतदारांनी हक्क बजावला.

हेही वाचा :

मोठी बातमी! शाळेतील वादातून वर्गात विद्यार्थ्याचा गळा चिरला

दहावी आणि बारावीच्या परिक्षांचे वेळापत्रक जाहीर, कधी होणार परिक्षा!

कोल्हापुरात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यास धक्काबुक्की; हजारो कार्यकर्ते आमने-सामने