मित्रानेच केली मित्राची दगडाने ठेचून हत्या; कारण ऐकून सरकेल पायाखालची जमीन

मुंबईतील रबाळे एमआयडीसी परिसरातील एका डोंगराच्या पायथ्याशी नऊ दिवसांपूर्वी एक खूनाची घटना घडली होती. येथे एका तरुणाची दगडाने ठेचून हत्या(Murder) करण्यात आली होती. अत्यंत भीषण अवस्थेत हा मृतदेह आढळून आला होता.

परंतु, हा सगळा परिसर निर्जन असल्याने ही हत्या नेमकी कोणी आणि कशासाठी केली? याबाबत कोणतीही माहिती पोलिसांना मिळत नव्हती. अखेर हत्येनंतर(Murder) ९ दिवसांनी पोलिसांनी या हत्येचे गूढ उकलले आहे. संबंधित तरुणाची त्याच्याच जीवलग मित्राने हत्या केल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणी रबाळे पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. दीपक बीद आणि दीपक गौंड अशी अटक केलेल्या दोन्ही आरोपींची नावे आहेत. तर मनोज बिद असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. दोन्ही आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांनीच ही हत्या केल्याचे उघड झाले आहे. २५ हजार रुपयांसाठी ही हत्या केल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

नवी मुंबईच्या रबाळे एमआयडीसीतील यादवनगर येथील रहिवासी असणाऱ्या मनोज सभाजित बिद याची हत्या(Murder) करण्यात आली होती. तो राहत असलेल्या परिसरातील डोंगर पायथ्याजवळ दगडाने ठेचून त्याची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी दीपक बीद आणि दीपक गौंड या दोघांना रबाळे पोलिसांनी अटक केली आहे.

मृत आणि आरोपी हे दोघेही एकमेकांचे मित्र होते. दोघांमध्ये घट्ट मैत्री असल्याने आरोपीला मृताच्या एटीएम कार्डचा पासवर्ड माहिती होता. एटीएमचा पासवर्ड माहिती असणे हेच तरुणाच्या खूनाचे कारण ठरले आहे. कारण आरोपी दीपक बिद याने मृत तरुणाचे एटीएम कार्ड चोरून त्याच्या खात्यातून २५ हजार रुपये काढले होते.

ही चोरी लपवण्यासाठीच त्याने आपल्या जीवलग मित्राचा खून केला आहे. एटीएममधून पैसे काढल्याचे सीसीटीव्हीच्या माध्यमातून मित्राला समजेल, या भीतीपोटी आरोपी दीपक बिद याने मनोजची दगडाने ठेचून हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पैशांच्या देवाणघेवाणीतूनच ही हत्या झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या घटनेचा अधिक तपास रबाळे पोलीस करत आहेत.

हेही वाचा :

पीएम किसान योजनेच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट समोर!

उद्धव ठाकरेंची टोपलीभर लिंबू तर शिंदेंकडून रेड्याची शिंग; राजकीय वर्तुळात ‘वर्षा’वरुन रंगलं राजकारण

मुख्यमंत्री आतिशी मार्लेना यांच्या अडचणींमध्ये वाढ; पोलिसांकडून गंभीर आरोप, FIR दाखल