महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी बनतंय छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य मंदिर!

भिवंडी वाडा रस्त्यावरील मराडे पाडा येथे शिवक्रांती प्रतिष्ठानच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रातील पहिले भव्यदिव्य मंदिर(temple) उभारण्यात येत आहे. तब्बल सात वर्षांपासून सुरू असलेल्या या मंदिराचे काम पूर्ण झाले असून, 17 मार्च रोजी तिथीनुसार येणाऱ्या शिवजयंतीला मंदिराचे लोकार्पण होणार आहे.

मूर्ती: अयोध्या येथील रामलल्लाची मूर्ती घडवणारे अरुण योगी यांच्या हस्ते सहा फूट अखंड कृष्णशिला पाषाणातून छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती घडवण्यात आली आहे.
बांधकाम: तब्बल एक एकर जागेवर 56 फूट उंचीचे हे मंदिर बांधण्यात आले आहे. पुढील 400 वर्षे टिकेल अशा पद्धतीने मंदिराचे बांधकाम करण्यात आले आहे.
संजय केळकर यांची भेट आणि प्रशंसा :
भाजपा आमदार संजय केळकर यांनी या मंदिराला भेट दिली आणि मंदिर परिसरातील कामाची माहिती घेतली. त्यांनी शिवक्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक राजुभाऊ चौधरी यांच्या मंदिर उभारणीच्या कार्याचे कौतुक केले.

“मी हे मंदिर(temple) बघून भारावून गेलो आहे. सर्वसामान्य वाड्या-पाड्यांमधील युवक एकत्र येतात आणि त्यांच्या मनात प्रेरणा येते की आपल्या हातून रोज शिवपूजन झाले पाहिजे,” असे संजय केळकर म्हणाले. “छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे केवळ दैवत नाही, तर देव आहेत, ज्यांनी महाराष्ट्राला नाही, तर देशाला जागे केले. त्यांचे महाराष्ट्रातील पहिले मंदिर या ठिकाणी उभे राहत आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक तरुणाने या ठिकाणी भेट दिली पाहिजे. आम्हाला असाच तरुण अभिप्रेत आहे, जो अशा कार्यातून देश घडवण्यासाठी योगदान देईल,” असेही ते म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराजांचे हे मंदिर डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे. शिवजयंतीला लोकार्पण झाल्यानंतर सामान्य नागरिकांना या मंदिरात दर्शनासाठी जाता येणार आहे. मंदिराची रचना, सुबक नक्षीकाम आणि हिरवळ लक्ष वेधून घेणारी आहे.
हेही वाचा :
जीबीएसचा धोका वाढला! या गोष्टींवर आणणार निर्बंध? केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचा मोठा निर्णय
‘रात्री फक्त 2 तासांसाठी गर्लफ्रेंड हवी’; प्रसिद्ध अभिनेत्याचं खळबळजनक वक्तव्य
सेल्फी घेत असलेल्या मेव्हणीला किस करायला गेला तितक्यात नवरीने जे केले Video Viral