मन सुन्न करणारी घटना, शेतात काम करताना लेकीचा ओरडण्याचा आवाज आला अन्…

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील गणेगाव दुमाला परिसरातून एक अतिशय दुर्दैवी घटना(incident) समोर आली आहे. पिकअप गाडीजवळ खेळत असताना, गाडीचे चाक अंगावरून गेल्याने एका तीन वर्षांच्या चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

नेहा दीपक पवार असे या दुर्दैवी चिमुकलीचे नाव असून सुनील दत्तात्रेय खळदकर असे पिकअप चालकाचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे(incident). या प्रकरणी दीपक सुरेश पवार यांनी फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दीपक पवार हे दौंड तालुक्यातील नानगाव येथील एका गुऱ्हाळावर कामासाठी सहकुटुंब वास्तव्यास आहेत. ते ऊसतोडीचे काम करतात. रविवारी सकाळी ते आपल्या कुटुंबासह पिकअपमधून ऊस तोडण्यासाठी गणेगाव दुमाला येथे आले होते.

पिकअप चालकाने गाडी शेतातील कच्च्या रस्त्यावर लावली आणि गाडीला चावी तशीच ठेवून तो घरी निघून गेला. दीपक पवार आपल्या सहकाऱ्यांसोबत शेतात ऊस तोडत होते. नेहा त्यावेळी पिकअपजवळ खेळत होती. काही वेळाने तिचा मोठ्याने ओरडण्याचा आवाज आला.

नेहाचा आवाज ऐकून वडील दीपक यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी त्यांच्या निदर्शनास आले की, नेहाच्या अंगावरून पिकअप गाडीचे चाक गेले होते. नेहा बेशुद्धावस्थेत होती. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

या प्रकरणी पोलिसांनी पिकअप चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र, नेमके चाक अंगावरून कसे गेले याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत

हेही वाचा :

रोहितचे चाहत्यांशी सेल्फीमधून स्नेह; कोहलीच्या नकाराचा चर्चेत ठसा

निवडणूक आयोगाविरोधात काँग्रेस आक्रमक; ‘या’ तारखेला राज्यभर आंदोलन

संजू सॅमसनच्या वडिलांचा गंभीर आरोप, क्रिकेट विश्वात खळबळ