घरात घुसून बिबट्याने केला श्वानावर हल्ला, मग पुढे असं काही घडलं… Video Viral

सोशल मीडियावर पुन्हा एकदा वन्य प्राण्यांशी संबंधित एक मनोरंजक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.यात एका बिबट्याने (leopard) घरात घुसून कुत्र्यावर हल्ला केल्याचे दिसते. ही घटना घराच्या समोर घडली जिथे कुत्रा आनंदाने खेळत होता. मात्र त्याचा हा आनंद क्षणात हिरावला जातो कारण पुढच्याच क्षणी तिथे बिबट्याची एंट्री होते.

बिबट्या शांतपणे तिथे पोहचतो आणि थेर कुत्र्यावर हल्ला चढवतो. ही थरारक घटना आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून लोक यातील थरार पाहून थक्क होत आहेत. पुढे नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
मुळातच बिबटा(leopard) हा जंगलातील सर्वात धोकायदायक प्राणी म्हणून ओळखला जातो. आपल्या वेगाच्या जोरावर तो क्षणात समोरच्यावर हल्ला करतो आणि त्याला आपली शिकार बनवतो. बिबट्याच्या शिकारीचे अनेक व्हिडीओज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
आताही इथे असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात बिबट्याने एका श्वानावर हल्ला केल्याचे समजते. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे यात बिबट्याचा विजय होत नाही. पुढच्याच क्षणी असे काहीतरी घडते ज्यामुळे बिबट्याला तेथून आपला पळ काढावा लागतो.
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. यामध्ये घरासमोर खेळणाऱ्या कुत्र्यावर बिबट्याने अचानक हल्ला केला. बिबट्याची चपळता आणि ताकद पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले. बिबट्या कुत्र्याचा जबडा पकडतो आणि त्याची शिकार करण्याचा प्रयत्न करतो, कुत्राही आपल्याला बिबट्याच्या तावडीतू सोडण्याचा जीवच्या आकांताने प्रयत्न करू लागतो मात्र बिबट्याची पकड इतकी भक्कम असते की त्याला काहीच करता येत नाही.
यानंतर बिबट्या(leopard) श्वानाला खाणार तितक्यातच बिबट्या अचानक त्याला सोडतो आणि तेथून पळ काढत हवेच्या वेगात तिथून निघून जातो. मानवी वस्तीत आपल्याला धोका असल्याचे बिबट्याला कदाचित समजले असावे आणि त्याने तेथून लगेच पळ काढल्याचा अंदाज आह.
हा व्हायरल व्हिडिओ @wildanimalearth98 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘घरातील कुत्र्यावर बिबट्याचा हल्ला’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओला हजारो व्ह्यूज मिळाले असून अनेक युजर्सने कमेंट्स करत या घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “समस्या अशी आहे की बिबट्याला कसे लढायचे हे माहित आहे, तर मूळ पाळीव कुत्र्याला याची कल्पना नाही. गरीब कुत्रा” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “कुत्र्याने सर्वोत्तम लढा दिला आणि तो पळून गेला नाही”.
हेही वाचा :
आता जमिन मोजणी होणार तासात; नागरिकांना मोठा दिलासा
अवघ्या 48 तासांनी ‘या’ 3 राशींचं उजळणार भाग्य; बॅंक बॅलेन्स होणार दुप्पट
पूनम पांडेसोबत सेल्फी काढताना चाहत्याने ओलांडली मर्यादा! Kiss करण्याचा प्रयत्न; Video व्हायरल