मराठी माणसावर प्ररप्रांतीय महिलांचा जीवघेणा हल्ला, ‘डोक्यात फरशी मारुन…’

मुंबईत मराठी भाषेवरुन अनेक वाद होताना आपण पाहतोय. मुंबईत राहून मराठी बोलणार नाही, असे अनेकजण ठणकावून सांगतात. दरम्यान मुंबईत मराठी माणसाला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. येथे परप्रांतीय महिलांकडून एका मराठी इसमावर जीवघेणा हल्ला(attacked) करण्यात आलाय. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

मुंबईत एका मराठी व्यक्तीवर परप्रांतीय महिलांनी हल्ला केलाय. जुन्या वादातून या महिलांनी मराठी माणसाच्या डोक्यात फरशी मारलीये. शुक्रवारी हा प्रकार घडला. अमृत निकम या 48 वर्षीय इसमावर जीवघेणा हल्ला(attacked) झाला. पूर्वीच्या भांडणातून निकम यांच्या डोक्यात फरशी मारल्याचे सांगितले जात आहे. मारहाणीत अमृत निकम आणि त्यांची पत्नी आशा निकम जखमी झाल्या. घटना सीसीटीव्हीत कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर पोलिसांना गुन्हा दाखल केलाय.
या फरशीचा वार इतका जोरात होता की फरशी डोक्यात पडल्यावर अमृत निकम जागीच हलायला लागले. या मारहाणीची दृश्य सीसीटीव्हीत चित्रित झाली आहेत. याप्रकरणी पोलिसांनी हल्ला करणाऱ्या दोन्ही महिलांविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केलाय.
हेही वाचा :
चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर चाहत्यांचे होणार स्वप्नभंग; रोहित शर्मा करणार ‘या’ गोष्टीला अलविदा..
महिला दिनी हादरवून सोडणारी घटना समोर; हम्पीमध्ये परदेशी महिलेवर बलात्कार
स्टेजवरच जबरदस्ती करायला लागला वर, मग वधूने असे हाणले… Video Viral