शेजारणीसाठी पुरुष बनली विवाहित महिला; केलं असं कृत्य की नवराही पळाला
आपल्या जवळच्या व्यक्तींनीच आपला घात केल्याची प्रकरणं (light)काही कमी नाहीत. मुंबईतून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शेजारणीला शेजारणीनं फसवलं आहे. पुरुषी आवाज काढून तिला आपल्या जाळ्यात ओढलं. त्यानंतर जे घडलं ते धक्कादायक आहे. पोलिसांनी याप्रकरणी एका महिलेला अटक केली आहे.मुंबईलगतच्या काशिमिरामधील पृथ्वी प्राईट या उच्चभ्रू सोसायटीतील ही घटना आहे
. या बिल्डिंगमध्ये राहत होती ती ॲनी धैर्यमानी. तिची याच बिल्डिंगमधील रश्मी सजलकर आणि तिच्या नवऱ्याने. ॲनीच्या पतीचं निधन झालं, त्यानंतर ती कामाच्या शोधात होती. याची माहिती रश्मीला होती. याचाचा गैरफायदा तिनं घेतला. तिनं आणि तिच्या पतीनं ॲनीला लुटण्याचा कट रचला.
एके दिवशी बोलता बोलता रश्मीने ॲनीला एका मोठ्या कंपनीत 43 लाख रुपयांच्या वार्षिक पॅकेजमध्ये नोकरी देण्याचं वचन दिलं. अभिमन्यू नावाच्या व्यक्तीचा फोन (light)नंबर तिला दिला. ॲनीनं अभिमन्यूला फोन केला आणि कामाबाबत विचारलं. तेव्हा त्याने तिला लवकरात लवकर एका मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी मिळवून देण्याचं आश्वासन दिलं
त्यानंतर ॲनी आणि अभिमन्यूचं अनेकदा फोनवर बोलणं सुरू झाले. हळुहळू अभिमन्यूने तिच्याशी लग्नाच्या बहाण्याने पैसे उकळायला सुरुवात केली. काही महिन्यांतच तिनं त्याला 6 लाखांपेक्षा अधिक पैसे दिले. पण काही काळाने ॲनीला संशय आला. तिनं चौकशी केली तेव्हा त्याला कळलं की त्याच्याशी फोनवर बोलणारी व्यक्ती ही अभिमन्युन ही दुसरी कोणी नसून रश्मी सजल होती, जी तिला सहानुभूती दाखवून नोकरी मिळवून देण्याचं आश्वासन देत होती.
त्यानंतर ॲनीने काशिगाव पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. 26 जून रोजी काशीगाव इथं रश्मी आणि तिचा पती सजलविरुद्ध(light) फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास करून पोलिसांनी आरोपी रश्मी सजलकर हिला अटक केली. तर तिचा नवरा अद्याप फरार आहे, अशी माहिती डीसीपी प्रकाश गायकवाड यांनी दिली आहे.
हेही वाचा :
जीवनात यशस्वी व्हायचे आहे? आचार्य चाणक्यांच्या ‘या’ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा
लुटेरी दुल्हन! दोन राज्यांमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर निघाली HIV पॉझिटिव्ह
सकाळी लवकर उठण्याचे फायदे: निरोगी जीवनाचा गुपित