मराठीत Artificial Intelligence वर चित्रपट येतोय; परदेशात शुटिंगलाही सुरुवात, कलाकार कोण?
सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स(artificial intelligence) हे नाव कमालीचं चर्चेत आहे. अलीकडे एआय टुल्सचं आपल्या जीवनातील प्राधान्य वाढत चाललं आहे. सध्या हा प्रभाव मर्यादित आहे, परंतु येत्या काही दिवसांत चॅट जीपीटी आणि गुगल बोर्डचा वापर असाच वाढत राहिला, तर मोठं नुकसान सहन करावं लागेल. याच आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर भाष्य करणारा लवकरच आगामी चित्रपट रिलीज होणार आहे. नुकतंच या चित्रपटाचा मुहूर्त पार पडला आहे.
एका वेगळ्या विषयावर भाष्य करणारा ‘धर्मा- द एआय स्टोरी’ चित्रपट(artificial intelligence) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाच्या शुटिंगला परदेशामध्ये सुरूवात झालेली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित हा पहिलाच मराठी चित्रपट असणार असून नुकतीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे.
चित्रपटाची घोषणा दिग्दर्शक पुष्कर जोगने सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केलेली आहे. “Lights… कॅमेरा… आणि AIच्या जंजाळात आपल्या मुलीच्या शोधात एका बापाचा प्रवास… धर्मा – The AI Story, लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला” असं कॅप्शन देत अभिनेत्याने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केलेली आहे.
बियु प्रॉडक्शन निर्मित ‘धर्मा- दि एआय स्टोरी’चे दिग्दर्शन पुष्कर जोग करणार असून चित्रपटाची निर्मिती तेजल पिंपळे करणार आहे. पुष्कर जोग कायमच मराठी सिनेसृष्टीला हटके विषय देत असतो. त्याच्या प्रत्येक चित्रपटाचे कथानक नाविन्यपूर्ण असते. त्यामुळे या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना नक्कीच काहीतरी भन्नाट पाहायला मिळणार, हे नक्की.
चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत पुष्कर जोगसोबत दीप्ती लेले आणि स्मिता गोंदकर दिसणार आहे. आतापर्यंत आपण एआय टेक्नॉलॉजी आपण फक्त सोशल मीडिया आणि इतर वेगवेगळ्या गेमिंग प्लॅटफॉर्मवर पाहिली होती. आता हाच विषय थेट आपल्याला मराठी चित्रपटात पाहायला मिळणार असल्याने ‘धर्मा- दि एआय स्टोरी’ विषयीची उत्सुकता आता वाढलेली दिसत आहे.
हेही वाचा :
काँग्रेसमध्ये मोठ्या हालचाली, बड्या नेत्यांना तातडीने बोलवले…
कांद्यावरील निर्यातबंदी उठवा, केंद्राच्या कांदा खरेदी याेजनेला शेतक-यांचा विराेध
यंदाचा राम जन्मोत्सव खास, रामनवमीनिमित्त १ लाख ११ हजार १११ किलोंचे लाडू अयोध्येत पाठवणार