IPL 2025 सुरू होण्याआधीच बहुचर्चित खेळाडूची माघार; दोन वर्षांच्या बंदीची कारवाई होणार?

मागील काही वर्षामध्ये भारतीयांचं क्रिकेटप्रेम ओसंडून वाहत आहे आणि त्यांच्या या क्रिकेटप्रेमाला निमित्त ठरत आहेत त्या म्हणजे बहुविध क्रिकेटस्पर्धा. विश्वचषक म्हणू नका किंवा मग चॅम्पियन्स ट्रॉफी प्रत्येक स्पर्धेतून असा एक खेळाडू(player) चमकून जातो की पुढच्या स्पर्धेपर्यंत ते म्हणजे ‘स्टार खेळाडू’ शरतो.

आताही काहीसं असंच चित्र आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा पूर्ण झाली असून, भारतीय क्रिकेट संघानं या स्पर्धेचं जेतेपद पटकावलं. इथं या सामन्याच्या चर्चा मागे पडत नाहीत तोच इंडियन प्रिमीयर लीग अर्थात आयपीएल चा जल्लोष कधी सुरू होणार, असाच प्रश्न क्रिकटप्रेमी विचारत आहेत. तत्पूर्वी या उत्साही वातावरणात काही क्रिकेटप्रेमींचा हिरमोड करणारं एक वृत्त नुकतंच समोर आलं आहे. हे वृत्त म्हणजे एका आघाडीच्या खेळाडूनं(player) स्पर्धेतून एकाएकी घेतलेली माघार.

22 मार्चपाससून आयपीएलची सुरुवात होणार असली तरीही तत्पूर्वी इंग्लंडचा खेळाडू हॅरी ब्रूक यानं यंदाच्या वर्षी IPL न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या नियमावलीनुसार हा निर्णय ब्रूकला महागात पडू शकतो, ज्यामुळं त्याला तब्बल दोन वर्षांसाठी बंदीचाही सामना करावा लागू शकतो. आयोजकांनी जर नियमांची कठोर अंमलबजावणी सुरू केली तर, ब्रूकला आयपीएलमध्ये दोन वर्षांची बंदी लागू शकते.

यंदाच्या आयपीएलसाठी दिल्लीच्या संघानं ब्रूकची निवड केली होती. त्याच्यासाठी संघ प्रबंधकांनी तब्बल 6.25 कोटी रुपये इतकी रक्कम मोजली होती. नुकतंच ब्रूकनं सोशल मीडियाचा आधार घेत आपल्या या निर्णयाची माहिती चाहत्याना दिली. ज्यावेळी त्यानं दिल्ली कॅपिटल्स या पूर्ण संघासह क्रिकेटप्रेमींची माफीही मागितली. स्पर्धेतून माघार घेण्याची ही ब्रूकची पहिलीच वेळ नाही. यापूर्वीसुद्धा त्यानं काही खासगी कारणांनी आयपीएलच्या 2024 मधील पर्वातून काढता पाय घेतला होता.

आयपीएलमधून माघार घेणं हा आपल्यासाठी अतिश. आव्हनात्मक निर्णय असल्याचं सांगताना तूर्तास आपण पूर्णपणे इंग्लंडच्या संघावर आणि खेळावर लक्ष केंद्रीत करू इच्छितो असं कारण त्यानं पुढे केलं. आयपीएलमधून एखाद्या खेळाडूनं इतक्या अखेरच्या क्षणी काढता पाय घेण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीसुद्धा अनेक खेळाडूंनी या स्पर्धेतून माघार घेतल्याचं पाहायला मिळालं.

खेळाडूंच्या या तडकाफडकी निर्णय घेण्यामुळं अखेर एक नियमही लागू करण्यात आला. ज्यानुसार एखाद्या खेळाडूनं जर लिलावात नावनोंदणी केली आणि लिलावात त्याला एखाद्या संघानं खरेदी करून क्रिकेटपर्व सुरु होण्याआधी या खेळाडूनं स्पर्धेतून माघार घेतली तर या खेळाडूवर स्पर्धा आणि लिलाव प्रक्रियेकत सहभागी न होऊ देता दोन वर्षांची बंदी घालण्यात येईल. आता या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येते का आणि ब्रूकवर याचा कोणता परिणाम होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

हेही वाचा :

गुड न्यूज! लालपरीचं LIVE लोकेशन कळणार थेट मोबाइलवर

पाण्याची टाकी साफ करताना ५ सफाई कर्मचाऱ्यांचा गुदमरून मृत्यू

घटस्फोटानंतर युजवेंद्र चहलच्या नव्या प्रेमाची चर्चा? दुबईत ‘या’ मिस्ट्री गर्लसोबत दिसला!