अनैतिक संबंधातून जन्मलेल्या नवजात मुलीला प्रियकराने ठार केलं
नांदेडमध्ये २३ दिवसाच्या नजवात मुलीची हत्या झालीय. (newborn)मृत्यूनंतर तिचा मृतदेह नदीत फेकून दिल्याचं समोर आलंय.नांदेडमध्ये अनैतिक संबंधातून जन्मलेल्या मुलीची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपीने जन्मल्यानंतर २३ दिवसानंतर या मुलीची हत्या करून मृतदेह नदीत फेकला होता. प्रियकरानेच अनैतिक संबंधातून जन्मलेल्या २३ दिवसाच्या नवजात मुलीला संपवल्याचं समोर आलंय. या घटनेमुळे नांदेडमध्ये मोठं संतापजनक वातावरण असल्याची माहिती मिळतेय.नांदेड जिल्ह्यातील एका विधवा महिलेचे तिच्या नात्यातीलच एका विवाहित पुरुषाशी अनैतिक संबंध होते.
या संबंधातून या दोघांना एक मुलगी झाली. परंतु आरोपीच्या कुटुंबीयांचा या संबंधाला कडाडून विरोध होता. त्यामुळे आरोपीच्या घरी तणावाचं वातावरण होतं, त्यात मुलगी झाल्यामुळे सारखी भांडणं देखील होत होती. या सगळ्यातून सुटका मिळविण्यासाठी आरोपीने मुलीला संपवण्याचा निर्णय घेतला.आरोपी (newborn)शेषेराव भुरे याने अनैतिक संबंधातून जन्मलेल्या त्याच्या २३ दिवसाच्या मुलीची गळा आवळून हत्या केली. हत्या केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने मुलीला लेंडी नदी पत्रात फेकून दिलं होतं.
माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी आरोपी शेषेराव भुरे याला ताब्यात घेतलंय. याप्रकरणी अधिकचा तपास करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विश्वनाथ झुंझारे यांनी दिलीय. तर आरोपींनी पोलीस चौकशीत गुन्हा कबूल केल्याची माहिती मिळत आहे.दादर रेल्वे स्थानकात काल रात्री एका बॅगेत मृतदेह सापडला होता. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतलंय. आपापसातील वादामुळे आरोपींनी खून केल्याची घटना घडलीय. (newborn)पायधूनीच्या किक्का स्ट्रीटवर हत्या केल्याचं समोर आलंय, तर आरोपी आणि मृत व्यक्ती मूक बधीर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ११ वर बॅगेत मृतदेह सापडला होता.
हेही वाचा:
दुधात भिजवलेले मनुके आणि पुरुषांची प्रजनन क्षमता: तज्ज्ञांची मते
पाऊस न पडताच पंढरपूरला पूर,धरणांतून मोठा विसर्ग; चंद्रभागा पातळीबाहेर..
सर्व्हर डाउनमुळे ‘नारी शक्ती ऍप’ ठप्प; महिलांमध्ये संताप