रुग्णालयातून घरी परतणाऱ्या नर्सची बलात्कार करून हत्या
रुग्णालयातून घरी परतणाऱ्या महिला नर्सवर बलात्कार करण्यात आला. (nurse)त्यानंतर तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत आरोपीला अटक केली आहे.कोलकाता येथील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्याची घटना ताजी असतानाच आता उत्तराखंडमध्येही अशाच प्रकारची संतापजनक घटना घटना घडली. रुग्णालयातून घरी परतणाऱ्या महिला नर्सवर बलात्कार करण्यात आला. त्यानंतर तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत आरोपीला अटक केली आहे.
महिला डॉक्टरनंतर आता परिचारिकेवर बलात्कार करून तिची हत्या केल्याने संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. धरेंद्र कुमार असं अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचं नाव आहे. धरेंद्र हा मूळ बरेलीचा रहिवासी असून तो उधमिंहनगरमध्ये मजुरीच्या कामासाठी येत होता.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर परिचारिका उत्तराखंडच्या उधमसिंहनगर जिल्ह्यात एका रुग्णालयात कामाला होती.(nurse)31 जुलैला परिसचारिका नेहमीप्रमाणे कामावर गेली. त्यानंतर ती घरी परतलीच नाही. तिच्या बहिणीने रुग्णालयात फोन करून विचारले असता, परिचारिका काम आटोपून घराकडे निघाली होती, असं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, परिचारिकेच्या बहिणीने तातडीने पोलिसांत धाव घेऊन हरवल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी या परिचारिकेची शोधाशोध घेतली असता ८ ऑगस्ट रोजी तिचा मृतदेह एका रिकाम्या जागेवर आढळून आला. पोलिसांनी आसपासचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, त्यांना एक मोठा पुरावा सापडला.
रुग्णालयातील काम आटोपून घरी निघालेल्या परिचारिकेचा धर्मेंद्र कुमार हा पाठलाग करत असल्याचं दिसून आलं. पोलिसांनी त्लाया शोधून कसून चौकशी केली तेव्हा त्याने आपला(nurse) गुन्हा कबूल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार धर्मेंद्र कुमारने 31 जुलैच्या रात्री नर्सला घरी जाताना बघितलं.त्याने तिला वाटेतच अडवून तोंड दाबून एका निर्जनस्थळी नेलं. तिथे आरोपीने नर्सवर अतिशय अमानुषपणे बलात्कार केला. बलात्कारानंतर आरोपीने नर्सची हत्या केली. तसेच तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने तसेच पर्समधील पैसे घेऊन पळ काढला. आरोपी धर्मेंद्र कुमार हा एक ड्रग अॅडिक्ट आहे. त्याला ही नर्स कोण हे माहीतही नव्हतं.
हेही वाचा :
थंड पाण्याने अंघोळ केल्याने वजन कमी होईल का? तज्ज्ञांचे मत काय?”
“भारत-श्रीलंका वनडे मालिका: पंचांच्या चुकीमुळे सुपर ओव्हर न झाल्याने पहिला सामना राहिला टाय”
‘या’ विभागात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! ’31 ऑगस्टपर्यंत करा अर्ज