राजकारण गाजवणाऱ्या बड्या नेत्याने राजकीय संन्यासाची केली घोषणा!

महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणूक होणार आहे. यामुळे सर्वच राजकीय(political retirement) पक्ष जोरदार तयारी करत आहेत. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांनी आज मोठी घोषणा केली आहे. यावेळी एकनाथ खडसे यांनी निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राजकीय संन्यासाची घोषणा केली आहे.

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, महाराष्ट्रातील राजकारणामध्ये(political retirement) तब्बल चार दशकांपासून कार्यरत असलेलेनेते एकनाथ खडसे यांनी आज राजकीय संन्यासाची घोषणा केली आहे. त्यामुळे आता एकनाथ खडसे हे कोणतीही निवडणूक न लढण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला आहे. तसेच यावेळी त्यांनी भावनिक वक्तव्य देखील केल आहे.

एकनाथ खडसे म्हणाले की, पुढील निवडणूक मी पाहणार की नाही पाहणार हे ईश्वरच ठरवेल. त्यामुळे एकनाथ खडसे यांनी त्यांची मुलगी रोहिणी खडसे हिला विजयी करण्याचे आवाहन देखील जनतेला केले आहे. तसेच एकनाथ खडसे यांनी जवळपास चार दशके जळगावसह महाराष्ट्रातील राजकारण गाजवले आहे. त्यामुळे आता सभागृहातील त्यांची भाषणे प्रचंड गाजली होती.

यासंदर्भात सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एकनाथ खडसे म्हणाले की, मी नाथाभाऊ बोलत आहे. कारण 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक होत आहे. या निवडणुकीत रोहिणी खडसे राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवार आहेत. त्यामुळे यापुढे मी निवडणूक लढवणार नाही.

तसेच मी गेली अनेक वर्षे आपल्यासोबत आहे. त्यामुळे गेली अनेक वर्षे आपण सर्वांनी मला सहकार्य केले आहे. याशिवाय मी कधीही जात-धर्म न पाहता सर्वांना मदत देखील केली आहे. मात्र आता प्रकृतीच्या कारणामुळे मी पुढची निवडणूक पाहणार की नाही, हे ईश्वरच ठरवेल. परंतु आता आपण मला जसे सहकार्य केले तसे सहकार्य रोहिणी खडसे यांना करावे आणि निवडून आणावे असे भावनिक आवाहन एकनाथ खडसे यांनी केले आहे.

हेही वाचा :

सीएनजीच्या दरात वाढ होण्याची शक्यता

राज्यात तळीरामांचे वांदे! एक-दोन नाही 4 दिवस Dry Day घोषित

निकालापूर्वीच पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रातील पराभव स्वीकारला