बदलापूर प्रकरणाची पुनरावृत्ती शिक्षकाची १४ वर्षीय विद्यार्थीनीसोबत गैरवर्तवणूक
बदलापूर प्रकरणाची पुनरावृत्ती अमरावतीमध्ये झाल्याची दिसत आहे. (teacher)एका शिक्षकाने १४ वर्षीय विद्यार्थिनीसोबत गैरवर्तवणूक केल्याचं समोर आलंय.राज्यभरात बदलापूरमधील बालअत्याचार प्रकरणाचे पडसाद जिवंत आहे. दरम्यान बदलापूर प्रकरणाची पुनरावृत्ती अमरावतीमध्ये झाल्याचं समोर आलंय. शिक्षकाने एका १४ वर्षीय विद्यार्थीनीसोबत गैरवर्तवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. संबंधित आरोपी शिक्षक अटकेत असल्याची माहिती मिळतेय. आपण या घटनेबद्दल सविस्तर पाहू या.
याबाबत सविस्तर वृत्त असं की, अमरावती शहरात शारीरिक शिक्षणाच्या शिक्षकानेच १४ वर्षीय विद्यार्थीनीसोबत गैरवर्तवणूक केलीय. हा धक्कादायक प्रकार महानगरपालिकेच्या शाळेमध्ये उघडकीस आलाय. या प्रकरणी अमरावतीच्या फ़्रेजरपुरा पोलीस ठाण्यात आरोपी शारीरिक विभागाच्या शिक्षकाला अटक करून गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.शाळेमध्ये एका मुलीची प्रकृती खराब झाली होती. त्यानंतर (teacher)त्या ठिकाणी मुलींचा मोठा घोळका जमा झाला होता. त्यानंतर त्या ठिकाणी सगळ्या मुली गोळा झाल्या असताना संबंधित शिक्षक त्या ठिकाणी आला. त्याने पीडित विद्यार्थीनीला बॅड टच केला असल्याचं या १४ वर्षीय मुलीने आपल्या आईला सांगितलं आहे. त्यानंतर आईने पोलिसात तक्रार केली. पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून शिक्षकाला पोलिसांनी अटक केलीय. आरोपी शिक्षकाला आज न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक निलेश करे यांनी दिलीय.
कोलकातामधील डॉक्टरवरील अत्याचाराच्या घटनेनंतर महाराष्ट्रामध्ये देखील लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं समोर आलंय. ठाणे, नाशिक आणि अहमदनगरमधून देखील (teacher)अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना समोर आल्या आहेत. या प्रकरणांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. यामुळे राज्यभरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. लैगिंक अत्याचाराच्या घटनेत असलेल्या आरोपीला फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी समाज करत आहे. या घटनांमुळे शक्ती विधेयक देखील पुन्हा चर्चेत आलंय.
हेही वाचा :
आनंदवार्ता! सोनं तब्बल ‘इतक्या’ हजारांनी घसरलं
शरद पवारांना झेड प्लस सुरक्षा: शंका आणि भाजपाची उपरोधिक प्रतिक्रिया
महाराष्ट्र नक्की हे काय घडतय? अनाथाश्रमातील तरुणींना वेश्याव्यवसायात ढकललं
2027 पर्यंत ‘या’ 3 राशी जगतील राजासारखं आयुष्य