ग्राहकांना नव्या महिन्याच्या पहिल्या दिवशीच धक्का, गॅस सिलिंडरच्या किंमतीत मोठी वाढ ? ; जाणून घ्या नवे दर
सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या दिवशीच ग्राहकांना तेल विपणन कंपन्यांकडून मोठा धक्का बसला आहे. 1 सप्टेंबरपासून व्यावसायिक एलपीजी (LPG)गॅस सिलिंडरच्या किमतीत लक्षणीय वाढ करण्यात आली आहे.
मुंबईत 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत 39 रुपयांनी वाढवून 1644 रुपये करण्यात आली आहे, जी यापूर्वी 1605 रुपये होती.
कोलकाता, चेन्नई, आणि इतर शहरांमध्येही गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ झाली आहे. कोलकात्यात याची किंमत 1802.50 रुपये झाली आहे, तर चेन्नईत 19 किलोचा सिलिंडर आता 1855 रुपयांना मिळणार आहे. मागील काही महिन्यांत एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वारंवार बदल होत आहेत, ज्यामुळे व्यावसायिकांसाठी आणि घरगुती ग्राहकांसाठीही हा एक मोठा आर्थिक भार ठरत आहे.
हेही वाचा:
आमदार नितेश राणे यांना पोलिस निरीक्षक यांचा कडक इशारा
बिग बॉस मराठी ५: आर्याच्या ‘भाऊ’ कमेंटवर रितेश संतापला, “निक्कीशिवाय तुझा गेम नाही”
२० व्या वर्षी कोट्यधीश, नंतर दिवाळखोरी, पुन्हा भरारी: यशस्वी उद्योजकाची प्रेरणादायी कहाणी