ठाकरे, शिंदे की फडणवीस? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाबाबत सर्वेक्षणात धक्कादायक खुलासा

महाराष्ट्र विधानसभा(political news) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी आपली ताकद पणाला लावली आहे. हरयाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीने विचारपूर्वक आपली पावले उचलताना दिसत आहे. तर दुसरीकडे महायुतीदेखील कोणताही धोका पत्करण्याच्या मनस्थितीत नसल्याचे दिसत आहे.

महाराष्ट्र विधानसभा(political news) निवडणुकीत उद्धव ठाकरेंपासून शरद पवारांपर्यंत ‘खरी विरुद्ध खोटी’ अशी राजकीय लढाई तर आहेच. पण त्यासोबतच उद्धव ठाकरे, शरद पवार, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांसाठी ही लढाई प्रतिष्ठेची ठरणार आहे. या सर्वांच्या राजकीय भवितव्यासाठी ही लढाई अत्यंत महत्त्वाची आहे. पण या सगळ्यात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार, याबाबत अनेक तर्कवितर्क काढले जात आहेत.

अशातच महायुतीची सत्ता आल्यास कोण मुख्यमंत्री होणार, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत लोकनीती-सीएसडीएसने याबाबत सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणात लोकप्रिय मुख्यमंत्री उमेदवारांवर लोकांना प्रश्न विचारण्यात आले. सर्वेक्षणात लोकांनी धक्कादायक उत्तरे दिली आहेत.

लोकनीती सीएसडीएसच्या सर्वेक्षणात, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, शरद पवार आणि अजित पवार हे मुख्यमंत्रीपदाचे लोकप्रिय दावेदार म्हणून लोकांना त्यांचे मत विचारण्यात आले. उद्धव ठाकरे हे सर्वेक्षणात अव्वल आहेत, ज्यांना 28 टक्के लोकांनी मुख्यमंत्रीपदासाठी लोकप्रिय उमेदवार मानले आहे.

20 टक्के लोकांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नावाला पसंती दिली आहे. तर लोकप्रिय दावेदार म्हणून पाहिले. देवेंद्र फडणवीस हे 16 टक्के लोकांनी पसंती दिली आहे. . त्याच वेळी केवळ 8 टक्के लोकांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना मान्यता दिली आहे.

दुसरीकडे 3 टक्के लोकांनी अजित पवार यांना मुख्यमंत्रीपदासाठी पसंती दिली आहे.विशेष म्हणजे, या सर्वेक्षणात उद्धव ठाकरे किंवा एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस यापैकी कोणालाही एकतर्फी आवडता चेहरा म्हणून जनतेने मान्यता दिलेली दिसत नाही, त्यामुळे ही आकडेवारी धक्कादायक मानली जात आहेत.

मात्र महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची लोकप्रियता एकत्र केली, तरी महाविकास आघाडीपेक्षा महायुतीला मिळालेल्या पसंतीपेक्षा जास्त आहे.

या आकडेवारीवर नजर टाकली तर 36 टक्के लोकांकडून महाविकास आघाडी आघाडीच्या बाजूने कल दिला आहे. त्याचवेळी महायुती मात्र 3 टक्के वाढ दिसत आहे. यावेळी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे. असे राजकीय जाणकारांचे मत आहे.महाविकास आघाडीने मुख्यमंत्री म्हणून कोणताही चेहरा पुढे केलेला नाही. त्याचवेळी महायुती सरकारमध्ये एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत. मात्र, निवडणूक निकालानंतर यात बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हेही वाचा :

‘रोहित निगेटीव्ह कर्णधार असून…’, Live मॅचदरम्यान गावकसरांनी झापलं

6 वर्षानंतर दया पुन्हा दिसणार; ‘CID’चा दमदार कमबॅक, शो लवकरच चाहत्यांच्या भेटीला

दिवाळीच्या तोंडावर मोदी सरकारचा मोठा निर्णय; ‘या’ योजनेअंतर्गत मिळणार डबल फायदा!