एकच नंबर! BSNLचा जबरदस्त प्लान;४२५ दिवस विसरा रिचार्जचा ताण

मोबाईल युझर्सला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी टेलिकॉम(bsnl) कंपन्यांमध्ये तीव्र स्पर्धा लागलेली आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपन्या स्वस्त रिचार्ज प्लान आणत असतात. BSNLने ग्राहकांसाठी नवीन प्लान आणलाय. BSNLने ग्राहकांसाठी ४२५ दिवसांची वैधता असलेला नवीन प्रीपेड प्लॅन लॉन्च केलेत. म्हणजेच या प्लानची वैधता एक वर्षापेक्षा जास्त आहे. विशेष बाब म्हणजे कंपनीने या प्लानची ​​किंमत जास्त ठेवली नाहीये. एक वर्षापेक्षा जास्त दिवस प्लानचा लाभ घ्यायचा असेल तर ग्राहकांना फक्त २,३९८ रुपयांमध्ये रिचार्ज करू करावं लागेल.

BSNL चा हा नवीन २,३९८ रुपयांचा प्रीपेड प्लान सर्वात परवडणारा प्लान(bsnl) आहे. या प्लान अंतर्गत, ग्राहक वैधता होईपर्यंत अमर्यादित विनामूल्य कॉलिंगसह दररोज १०० विनामूल्य एसएमएस पाठवू शकतील. यातील सर्वात भारी गोष्ट म्हणजे, दीर्घ वैधतेच्या या प्लानमध्ये ग्राहकांना ८५० GB डेटाही दिला जाणार आहे, म्हणजेच दररोज अंदाजे २ GB डेटा वापरण्यासाठी मिळेल. ज्या ग्राहकांना अधिक वैधता आणि अधिक डेटा हवा आहे त्यांच्यासाठी बीएसएनएलचा हा प्लान सर्वोत्तम ठरू शकतो. या प्लानची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे हा प्लान घेणारे ग्राहक अमर्यादितपणे इंटरनेट सेवेचा लाभ घेऊ शकतील.

प्रत्येक कंपनी वेगवेगळ्या परिक्षेत्रानुसार नव-नवीन प्लान आणत असतात. त्याचप्रमाणे बीएसएनएलचा हा नवीन प्लान देखील प्रत्येक क्षेत्रात उपलब्ध नसेल. ४२५ दिवसांची वैधता असलेला हा प्रीपेड प्लान सध्या जम्मू आणि काश्मीरमधील वापरकर्त्यांसाठी सादर करण्यात आलाय. त्यामुळे रिचार्ज करताना वापरकर्त्यांना त्यांच्या क्षेत्रानुसार प्लान निवडावा लागेल.

बीएसएनएलचा हा प्रीपेड रिचार्ज प्लान १०७ रुपयांचा आहे. या प्रीपेड प्लानमध्ये वापरकर्त्यांना ३५ दिवसांची वैधता मिळते. हा प्लान त्या वापरकर्त्यांसाठी आहे जे BSNL सिम दुय्यम क्रमांक म्हणून वापरतात. यामध्ये युजर्संला एकूण ३GB डेटाचा लाभ मिळणार आहे. तसेच, यात अमर्यादित इनकमिंग कॉल्स तसेच २०० मिनिटांच्या आउटगोइंग कॉलचा फायदा मिळणार आहे.

हेही वाचा :

Bajaj ची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर येतेय!

महाराष्ट्रात अवकाळी पावसाचं थैमान!

विधानसभेत काँग्रेस- ठाकरे गट वेगळे लढणार, प्रकाश आंबेडकर यांचं भाकीत