विधानसभेपूर्वीच महायुतीत वादाची ठिणगी?, शिंदे गटाच्या मंत्र्याचा थेट भाजपला इशारा

राज्यात विधानसभा (assembly)निवडणुका लवकरच होणार आहे. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. अशात निवडणुकीपूर्वीच महायुतीमधील अंतर्गत कलह आता चव्हाट्यावर येत आहे. शिंदे गटाच्या मंत्र्याने थेट भाजपला इशारा दिल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. ऐन निवडणुकीत महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडल्याचं यामुळे बोललं जातंय.

छत्रपती संभाजीनगरमधील सिल्लोडमध्ये केलेल्या आंदोलनानंतर पालकमंत्री अब्दुल सत्तार चांगलेच भडकले आहेत. भाजपने आम्हाला विरोध केल्यास आमचे शिवसैनिक देखील पूर्णपणे हिशोब घेतील, असा इशाराच अब्दुल सत्तार यांनी दिला आहे. याची राजकीय वर्तुळात आता चर्चा रंगली आहे.

भाजपचे वरिष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी सिल्लोडचा पाकिस्तान असा उल्लेख केल्यानंतर सत्तारांनी भाजपवर जोरदार निशाणा साधत थेट इशारा दिलाय.अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्यामुळे महायुतीतच नवा वाद ओढवल्याची चर्चा आता रंगू लागली आहे.

सिल्लोडमध्ये भाजपने अब्दुल सत्तार यांना विरोध करायला सुरुवात केल्यानंतर अब्दुल सत्तारांनीही मागेपुढे न बघता थेट भाजपला इशारा दिलाय. यामुळे महायुतीमधील वरिष्ठ नेत्यांची डोकेदुखी वाढू शकते. “त्यांनी विरोध केला तर आमचे शिवसेनावालेही त्यांचा पूर्ण हिशोब करतील. ज्या पद्धतीने भाजपचे कार्यकर्ते सिल्लोडमध्ये काम करतील, त्याच पद्धतीने आम्हीही पूर्ण मराठवाडाभर, महाराष्ट्रभर काम करू. सिल्लोड मध्ये जर मला विरोध केला तर संपूर्ण मराठवाड्यात शिवसेनाही तसंच वागणार.”, अशा शब्दात अब्दुल सत्तार यांनी भाजपला इशारा दिलाय.

अब्दुल सत्तार यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीमधील धुसफूस आता समोर येत आहे. यावर आता भाजप नेत्यांची काय प्रतिक्रिया उमटणार, याकडे सर्वांचं लक्ष असेल. महायुतीमधील तिढा वाढू नये यासाठी वरिष्ठ नेते काय भूमिका घेतात,याकडे देखील सर्वांच्या नजरा असतील.

विधानसभेसाठी(assembly) महाविकास आघाडी जोरदार तयारीला लागली असताना महायुतीमध्ये मात्र, रोज कोणत्या न कोणत्या नेत्याची नाराजी तसेच अंतर्गत कलह समोर येत आहेत. गेल्या काही दिवसांत महायुतीमधील अनेक नेत्यांनी मविआमध्ये प्रवेश केलाय. त्यामुळे महायुतीला निवडणुकीत मविआकडून मोठे आव्हान असणार आहे.

हेही वाचा :

तृप्ती डिमरीचा ‘तो’ व्हिडीओ पाहून चाहते संतापले

आजपासून नवरात्रीला सुरुवात, जाणून घ्या घटस्थापनेचा शुभ मुहूर्त व पूजेची पद्धत

मधमाशांच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू: शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा सवाल