चिमुकल्यांचा अनोखा गणेशोत्सव: भक्तीचा सुंदर संदेश देत नेटकऱ्यांची वाहवा

गणेशोत्सवाच्या धामधुमीत सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर (social media)मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये काही चिमुकल्यांनी स्वतःच्या छोट्या हातांनी गणेशोत्सव साजरा केला आहे. विशेष म्हणजे या मुलांनी मोठ्या थाटामाटात सण साजरा करण्याऐवजी साधेपणात भक्तीचा उत्सव साजरा केला आहे. या गणेशोत्सवात चिमुकल्यांनी मातीची मूर्ती तयार करून सजावटही साधेपणात केली आहे, ज्यामुळे या व्हिडिओने अनेक नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत.

“सण पैशाने नाही, तर भक्तीने साजरा करायचा” असं म्हणत नेटकऱ्यांनी या चिमुकल्यांची प्रशंसा केली आहे. व्हिडिओतील मुलांच्या साधेपणाने आणि आनंदाने भरलेल्या उत्सवाने अनेकांनी या मुलांच्या कार्याचं कौतुक केलं आहे. गणेशोत्सवाचं खरं महत्त्व भक्ती, श्रद्धा आणि एकत्रित आनंदात आहे, हा संदेश या व्हिडिओने दिला आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडिओ पाहून अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. “याला म्हणतात खरी भक्ती…” असं म्हणत नेटकरी या अनोख्या उत्सवाला दाद देत आहेत.

हेही वाचा:

मतांसाठी 1500 रुपयांत बहि‍णींना विकत घेतलं जातंय; योजनेवरुन संजय राऊतांचा हल्लाबोल

 सांगलीतील रिक्षा-टॅक्सी चालकांना होणार लाभ

आज ‘या’ 3 राशींना लाभणार सूर्यदेवाची कृपा, सर्व संकट होणार दूर!