सगळ्यांच्या नजरा खिळवणारा अभिषेक-ऐश्वर्या यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये!
बाॅलिवूडमधील लोकप्रिय जोडी म्हणून चर्चेत असणारे (popular)अभिषेक आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु आहेत. सोशल मीडियावर या दोघांच्या घटस्फोटाबद्दल बोललं जात होतं. एवढंच नाही तर, काही दिवसांपूर्वी अभिषेक एका बाॅलिवूड अभिनेत्रीला डेट करतोय अशा देखील चर्चा सुरु होत्या. मात्र, त्यावर बच्चन कुटुंब किंवा बाॅलिवूड अभिनेत्री यापैकी कोणीही भाष्य केलेलं नाहीये. दरम्यान, आता अभिषेक आणि ऐश्वर्याचा नवा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.अनेक कार्यक्रमांमध्ये अभिषेक आणि ऐश्वर्या एकत्रीत दिसतात, मात्र दोघे वेगवेगळ्या गाड्यांमधून एन्ट्री करत असतात. त्यामुळे नेटकरी सोशल मीडियावर त्यांना ट्रोल करत आहेत.
दरम्यान, नुकताच सोशल मीडियावर अभिषेक आणि ऐश्वर्याचा नवा व्हिडीओ व्हायरल होत आहे. अंबानींच्या एका कार्यक्रमात बिग बी, ऐश्वर्या राय आणि पती अभिषेक बच्चन यांनी हजेरी लावली. यावेळेस त्यांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.कार्यक्रमाला जात असताना अभिषेकने ऐश्वर्याला सर्वांसमोर (popular)संरक्षण दिलं आहे. यावेळी ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चनने त्यांच्या घटस्फोटाच्या अफवा फेटाळून लावल्याचं म्हटलं जात आहे. त्यांच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी आणि नेटकऱ्यांनी कमेंट्स पाऊस पाडला आहे.
अभिषेक बच्चन, अभिनेत्री निम्रत कौर हिला डेट करत असल्याचं म्हटलं जात होतं. इतकंच नाही तर, सध्या सोशल मीडियावर या दोघांच्या नात्याबद्दल जोरदार चर्चा सुरु होत्या. निम्रत आणि अभिषेक यांनी ‘दसवी’ सिनेमात एकत्र काम केलं होतं. चर्चा रंगल्यानंतर निम्रतला ट्रोलिंगचा सामना (popular)करावा लागला. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ‘लंचबॉक्स’ सारख्या सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारणारी अभिनेत्री निम्रत कौर आहे.
हेही वाचा :
पाणी प्रदूषणामुळे मिरजेतील गणेश तलावात ६०० किलो मासे मृत
हेल्मेट सक्तीबाबत महिलेचे विचित्र विधान; ऐकून पोलीसही झाले हैराण
थरकाप उडवणारी घटना; १५ वर्षीय मुलाच्या शरीराचे १७ तुकडे करून पुरले