एका स्त्रीने जवळ जवळ एक न्हवे तर ५० पुरुषांना लग्नाचे आमिष दाखवले…

तमिळनाडूतील तिरुपूर येथे एक धक्कादायक घटना उघडकीस (jewelry) आली आहे. येथील एका महिलेनं 50 पेक्षा जास्त पुरुषांशी विवाह केलं किंवा लग्नाचं आमिष दाखवून त्यांची फसवणूक करत त्यांच्या घरातून रोख रक्कम आणि दागिने लंपास केले आहेत. या प्रकरणी तिरुपूर येथील महेश अरविंद यांनी महिला पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनंतर ही महिला फरार होती, पण पोलिसांनी तिला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेचं नाव संध्या असून, ती अविवाहित पुरुषांचा शोध घेत असे. त्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीनं ती त्यांना स्वतःकडे आकर्षित करत असे. ती त्यांच्याशी लग्न करायची किंवा लग्नाचं आमिष दाखवायची आणि नंतर त्यांच्याकडील रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तू चोरून फरार व्हायची. या महिलेच्या फसवणुकीला आत्तापर्यंत 50 पेक्षा जास्त पुरुष बळी पडले आहेत. पोलिसांनी अथक प्रयत्न करून या महिलेला अटक केली आहे. चौकशीनंतर तिला न्यायालयात हजर करण्यात आलं आणि तिची तुरुंगात रवानगी करण्यात आली.

महेश अरविंद यांनी सांगितलं, “माझे कुटुंबीय माझा(jewelry) विवाह करू इच्छित होते. ते वेगवेगळ्या माध्यमातून मुलीचा शोध घेत होते. यादरम्यान माझी एका मोबाईल अॅपच्या माध्यमातून इरोड जिल्ह्यातील कोडुमुडी जिल्ह्यातील संध्या नावाच्या महिलेशी ओळख झाली. सुरुवातीला आमच्यामध्ये संवाद सुरू होता आणि दरम्यान आम्ही प्रेमात पडलो. पलानी जवळच्या एका मंदिरात जाऊन आम्ही विवाह केला.”

“विवाहानंतर मी संध्याला घेऊन घरी आलो. पण तिचं वर्तन मला संशयास्पद वाटत होतं. मी जेव्हा तिचं आधार कार्ड पाहिलं तेव्हा त्यावर संध्याऐवजी चेन्नईतील एका महिलेचं नाव लिहिलेलं होतं. तिचं वय देखील जास्त होतं. मी याबाबत विचारलं असता संध्या नाराज झाली आणि माझ्या कुटुंबियांना धमकी देऊ लागली,” असं महेश अरविंद यांनी सांगितलं.

महेश अरविंद यांनी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर,(jewelry) पोलीस दोन्ही बाजूच्या मंडळींना घेऊन स्टेशनला आले. पण संधीचा फायदा घेत संध्या तेथून फरार झाली. तपासात आरोपी महिला संध्या 10 वर्षांपूर्वी चेन्नईतील एका तरुणाशी लग्न झालेलं असून तिला एक मुलगा आहे, अशी माहिती समोर आली. त्यानंतर तिला अटक करण्यात पोलिसांना यश मिळालं, आणि सध्या ती तुरुंगात आहे.ही घटना समाजातील विवाहसंस्थेच्या सुरक्षिततेबद्दल आणि विश्‍वासार्हतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करते. या प्रकरणाने फसवणुकीच्या घटना वाढत असल्याचं स्पष्ट होत आहे. समाजातील प्रत्येकाने अशा फसवणुकीपासून सावध राहण्याची गरज आहे.

हेही वाचा :

विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी मतदान आज; रावसाहेब दानवेंचं सूचक विधान

रोज सकाळी ब्रेड खात असाल तर सावधान, शरीराचं होऊ शकतं भयंकर नुकसान

महाराष्ट्रात आज पुन्हा पाऊस, ‘या’ भागात मेघगर्जनेसह होणार जोरदार पाऊस