धक्कादायक! तरुणीचा फिरत्या पाळण्यातून तोल गेला अन्…; घटनेचा थरारक VIDEO
सोशल मीडियावर दर सेकंदाला काही ना काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ(VIDEO) आपल्याला पाहायला मिळतात. तर कधी धक्कादायक अशा घटनांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तुम्हाला माहितच असेल की सध्या देशभरात विविध ठिकाणी यात्रा सुरू आहे. या यात्रांमध्ये मोठे मोठे आकाशी पाळण, तसेच विविध ॲडवेंचर अशा गेम आपल्याला पाहायला मिळतात. सध्या यात्रेतीलच एक धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.
व्हायरल होत असलेला व्हिडिओ(VIDEO) उत्तप प्रदेशातील लखीमपुर येथील असल्याचे व्हिडिओमध्ये सांगण्यात आले आहे. येथील एक आकाशपाळणा, मोठ्या उत्सवासाठी लागला होता. यामध्ये काही लोक बसले होते. दरम्यान एक मुलगी त्या पाळण्यातून तोल जाऊन खाली पडते. सध्या या घटनेचा थररारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही मुलगी पाळण्यातून खाली पडते आणि पाळण्याला असलेल्या लोखंडी जाळ्यात अडकते.
व्हिडीओमध्ये पाहिलं जातं की संपूर्ण यात्रेच्या परिसरात अनेक आकाशपाळणे आहेत, परंतु एका मोठ्या पाळण्याच्या बाहेरील लोखंडी अँगलवर एक तरुणी लटकलेली दिसत आहे. या घटनेला पाहून तेथे उपस्थित असलेले लोक घाबरले आणि एक व्यक्तीने त्याचा मोबाईलमध्ये व्हिडीओ टिपला. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये दिली आहे. मात्र व्हिडीओ पाहून आकाशपाळण्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. विशेषतः लहान मुले या पाळण्यात बसत असल्याने, त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा गंभीर आहे.
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @BmjJatav या अकाऊंटवर शेअर करून घटनेची माहिती देण्यात आली आहे. यानंतर त्यामुलीचे काय झाले याबाबत अद्याप कोणतीही माहिती उपलब्ध नाही. हा व्हिडि सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटकऱ्यांनी पाळण्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे आणि भविष्यात या प्रकाराच्या सुरक्षिततेसाठी योग्य पावले उचलली जातील अशी आशा लोकांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा :
बापरे! …असं न केल्यास शाळांवर होणार मोठी कारवाई
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना महायुतीत मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता
फक्त एकच गोष्ट द्या, फडणवीस CM होताच सुळेंची मोठी मागणी