फक्त टॉवेल गुंडाळून तरुणी रस्त्यावर चालत सुटली VIDEO VIRAL
मुंबईच्या रस्त्यावर तरुणी फक्त टॉवेल गुंडाळून रस्त्यावर चालत सुटली. (publicity)अचानक असं काही घडलं की लोक टकामका बघू लागल्याचेही पाहायला मिळाले. तरुणीचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.सोशल मीडियावर दररोज नवनवीन ट्रेंड पाहायला मिळत आहे. याच सोशल मीडियावर अनेक रील्स देखील व्हायरल होतात. सध्या काही जण प्रसिद्धीसाठी वाटेल तसे रील्स व्हिडिओ करू लागले आहेत. आता सोशल मीडियावर ‘तौबा तौबा’ ट्रेंड पाहायला मिळत आहे. या गाण्यावर लोक खास स्टेप करताना दिसत आहेत. या ट्रेंडदरम्यान, एक तरुणी फक्त टॉवेल गुंडाळून रस्त्यावर चालत सुटली. या तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
फॅशन सुपरस्टार आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर तनुमिता घोष ही मुंबईच्या रस्त्यावर फक्त टॉवेल गुंडाळून उतरली. तिने फक्त गुलाबी रंगाचा टॉवेल गुंडाळला होता. तसेच एक टॉवेल तिने तिच्या ओल्या केसावरही गुंडाळला होता. जणू आंघोळ करून तरुणी थेट रस्त्यावरच आली, असे भासत आहे. या तरुणीला लोक टकामका बघू लागले. हा व्हिडिओ स्वत: तनुमिता घोषने शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना (publicity)कॅप्शनमध्ये म्हटलं की, ‘मुंबईतील लोक आज मला पाहून ‘तौबा-तौबा’ करत असतील. तनुमिताने स्पोर्ट शूज आणि कानातलेही घातले होते.
तनुमिताने रस्त्यावर चालताना अचानक गुंडाळलेला टॉवेल काढला. त्यानंतर तिने चांगला ड्रेस घातल्याचे दिसले. तनुमिताचा बोल्ड स्टंट पाहून लोकही शॉक होतात. तनुमिताने हा स्टंट करत लोकांचे लक्ष केंद्रीत केलं आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
तनुमिताचा व्हिडिओ लोकांनी १० लाखांहून अधिक वेळा पाहिला आहे. या व्हिडिओला हजारो लाइक्स मिळाले आहेत. तसेच हा व्हिडिओ अनेकांनी शेअर केला आहे. तसेच व्हिडिओवर कमेंट्सचा वर्षाव होत आहे. अनेकांनी तिच्यावर टीका देखील केली आहे. अनेकांनी तिची तुलना चर्चेत राहणाऱ्या सेलेब्रिटींसोबत केली आहे. अनेकांनी तिच्या स्टंटवर आक्षेप घेतला आहे.तनुमिताने स्पष्ट केलं की, ‘माझा हा व्हिडिओ २०१९ (publicity)सालचा असून एका शोचा आहे. त्यावेळी मला खास काम दिलं होतं. माझ्या या व्हिडिओला अधिक गांभीर्याने घेऊ नये. हा व्हिडिओ फक्त एंटरटेनमेंट म्हणून पाहा’ असं तिने स्पष्टीकरण दिलं तरी नेटकरी तिला ट्रोल करत आहेत.
हेही वाचा:
अखेर ऐश्वर्या रायने दिली कबूली म्हणाली, “सर्व काही….”
रायगडातील २८ पैकी २४ धरणे पूर्णपणे भरली; हेटवणे धरणात ९०% पाणी साठा
“सगळ्यांचा नाद करा पण पवारांचा नाही,” खासदार निलेश लंकेचा राम शिंदेंना थेट इशा