प्रेमसंबंधातून तरुणीवर वेळोवेळी अत्याचार; गर्भवती होताच गर्भपातही केला अन् नंतर…
गडचिरोली : एका मुलीवर अत्याचार करण्याता आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित मुलीवर अत्याचार करून गर्भपात(getting pregent) करणाऱ्या दोन आरोपींना अहेरी येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. एन. बावणकर यांनी मंगळवारी (दि. 3) पहिल्या आरोपीस सात वर्षे व दुसऱ्या आरोपीस 4 वर्षे सश्रम कारावास व दोन्ही आरोपींना 5 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
अनिल नानाजी ईजगामकर (34, रा. आलापल्ली), चंद्रकला सुरेश धानोरकर (47, रा. अनखोडा, ता. चामोर्शी) अशी शिक्षा सुनावलेल्या आरोपींची नावे आहेत. अनिल ईजगामकर याने पीडित मुलीशी तीन वर्षापासून प्रेमसंबंध जुळवून लग्न करतो, असे आमिष दाखवून वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यामुळे पीडिता गर्भवती(getting pregent) राहिली.
तिचा गर्भपात करण्याकरिता आरोपीची मावशी चंद्रकला धानोरकर हिच्या मदतीने पीडितेला औषध पाजून गर्भपात केला. त्यामुळे पीडितेला रक्तस्राव होऊन ती गंभीर आजारी पडली. पीडिता ही अल्पवयीन व अनुसूचित जाती जमातीची असल्याचे आरोपीस माहिती असतानाही त्याने तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
याबाबतच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला. तपासादरम्यान याप्रकरणातील पीडिता ही उपचारादरम्यान मृत पावली. त्यामुळे कलमात वाढ करण्यात आली. तपासात आरोपी विरुद्ध मृत्युपूर्व जबानी (बयाण) दिल्यामुळे तसेच सबळ पुरावा मिळून आल्याने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
अतिरिक्त सत्र न्यायालयाने फिर्यादी व साक्षीदार तसेच वैद्यकीय अभिप्राय यांचे पुरावा व सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीश बावणकर यांनी मंगळवारी आरोपी ईजगामकर याला 7 वर्षे सश्रम कारावास व 5 हजार रुपये दंड तसेच चंद्रकला धानोरकर हिला 4 वर्ष कारावास व 5 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
हेही वाचा :
नागा चैतन्य-शोभिता आज विवाहबंधनात अडकणार
इंग्रजीची स्पेलिंग चुकली म्हणून शिक्षिकेने दुसरीतील विद्यार्थ्याच्या पाठ, पायावर…
अखेर ठरलंं! भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत सर्वात मोठा निर्णय