दुसऱ्या महिलेचे आधार कार्ड खात्याला केले लिंक घेतला एक लाख रुपयाचा लाभ
शासनाच्या विविध योजना सुरु असून बांधकाम कामगारांसाठी (linkedin learning)देखील वेगवेगळ्या योजना राबविण्यात येत आहेतबांधकाम कामगारांना वेगवेगळ्या योजना राबवून मदत दिली जात आहे. दरम्यान बांधकाम कामगार कार्यालयाकडून इमारत बांधकाम कामगारासह त्याच्या पाल्यांना शिक्षण, आरोग्य यासह इतर बाबींसाठी आर्थिक लाभ दिला जातो. मात्र विधवा महिलेचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून एक लाख रुपयांचा लाभ घेतल्याचा धक्कादायक प्रकार बुलढाणा जिल्ह्यात समोर आला आहे.
शासनाच्या विविध योजना सुरु असून बांधकाम कामगारांसाठी देखील वेगवेगळ्या योजना राबविण्यात येत आहेत. मात्र बांधकाम कामगार असल्याचे दाखवत शासनाच्या योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे. बुलढाणा तालुक्यातील आकाश हिवाळे या व्यक्तीने हा प्रकार केला आहे. आकाश हिवाळे याने (linkedin learning)मंगला गायके या विधवा महिलेचे आधार कार्ड आपल्या स्वतःच्या बँक खात्याला लिंक करून एक लाख रुपयाचा लाभ घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
सदर महिला लाभ घेण्यासाठी आपले खाते नूतनीकरण करण्यासाठी बँकेत गेली असताना हा प्रकार समोर आला आहे. तर या संपूर्ण प्रकाराच्या बाबतीत बांधकाम कामगार कार्यालय मात्र(linkedin learning)अनभिज्ञ असून कार्यालयाचा अनागोंदी आणि गलथान कारभार यातून समोर आला आहे. दरम्यान फसवणूक करणाऱ्या या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
हेही वाचा :
आनंदवार्ता! सोनं तब्बल ‘इतक्या’ हजारांनी घसरलं
शरद पवारांना झेड प्लस सुरक्षा: शंका आणि भाजपाची उपरोधिक प्रतिक्रिया
महाराष्ट्र नक्की हे काय घडतय? अनाथाश्रमातील तरुणींना वेश्याव्यवसायात ढकललं
2027 पर्यंत ‘या’ 3 राशी जगतील राजासारखं आयुष्य