सांगलीतील धक्कादायक घटना: “आईला परत येतो म्हणून सांगून गेला अन्…
येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) येथील १८ वर्षीय विद्यार्थ्याचा राजस्थानच्या कोटा शहरात १ जानेवारीला (accident)अपघाताने मृत्यू झाला आहे. कुटुंबातील एकुलत्या मुलाच्या मृत्यूने खंडागळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. बारावी परीक्षेच्या तोंडावरच त्याचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. केशवराज खंडागळे असे या विद्यार्थ्याचे नाव आहे.
येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) सेवानिवृत्त मुख्याध्यापक गुणवंत खंडागळे यांचा (accident)केशवराज हा नातू होता. त्याला चांगले शिक्षण मिळावे, यासाठी आजोबांनी जीवापाड मेहनत घेतली. त्याच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करताना दहावीनंतर कोटा येथे कोचिंग क्लासमध्ये पाठविले.
केशवराजची बहीण वैष्णवी कराडमध्ये शिकत आहे. शेतकरी वडील अमोल काही दिवस कोटा येथे केशवराजसोबत, तर वैष्णवीसाठी काही दिवस गावात राहत होते. केशवराजची आई रूपा या मात्र मुलासोबत कोटा येथेच राहत होत्या.
३१ डिसेंबरला केशवराज लवकरच परत येतो, असे आईला सांगून घरातून बाहेर पडला. रात्री उशिरापर्यंत ताे न परतल्याने आईने शोध सुरू केला. कोटा येथील ओळखीच्या मराठी माणसांची मदत घेतली पण तो सापडला नाही. त्यांनी कोटा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली.
ही बातमी कळताच वडील अमोल हेदेखील त्वरित कोटाकडे रवाना झाले. याचदरम्यान कोटापासून दिल्लीच्या दिशेने सुमारे ८० किलोमीटर अंतरावर रेल्वे रुळांवर केशवराजचा मृतदेह सापडला. त्याचा अपघाती मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगताचं खंडागळे कुटुंबाला धक्क बसला. केशवराजचा मृतदेह रुळांवर सापडल्याने हा अपघात आहे की घातपात, याविषयी कुटुंबियांच्या मनात सांशकता आहे. सखाेल तपासानंतर कारण स्पष्ट हाेणार आहे.
केशवराजचा मृतदेह गावाकडे आणून त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. केशवराज एकुलता हाेता. मुलाच्या मृतदेहासोबत रुग्णवाहिकेतून २२ तास प्रवास करण्याची वेळ वडील अमोल यांच्यावर आली. आजोबा गुणवंत यांना नातवाच्या अपघाती मृत्यू झाल्याचे समजताच त्यांना मानसिक धक्का बसला. नातवाचा उच्च अधिकारी बनल्याचे पाहण्याचे त्यांचे स्वप्न अधूरेच राहिले.
हेही वाचा :
गौतम गंभीर ढोंगी! बोलतो ते कधीच करत नाही, फक्त क्रेडिट घेत असतो
VIDEO : ‘बाप बाहेर आलाय…’ येरवड्यातून सुटल्यावर भाईची जंगी रॅली
कुंभमेळ्याला जाणाऱ्या प्रवाशांनो भारतीय रेल्वेकडून महाकुंभ स्पेशल टूर पॅकेज